शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

एका निर्भयाने भर न्यायालयात आरोपीच्या श्रीमुखात हाणल्या

By admin | Updated: December 19, 2015 02:52 IST

बलात्काराचा खटला सुरू असताना शुक्रवारी एका पीडित मुलीने भरगच्च न्यायालयात आरोपीं बसण्याच्या बाकाजवळ जाऊन एका आरोपीच्या श्रीमुखात दोन-तीन हाणल्या.

नागपूर : बलात्काराचा खटला सुरू असताना शुक्रवारी एका पीडित मुलीने भरगच्च न्यायालयात आरोपीं बसण्याच्या बाकाजवळ जाऊन एका आरोपीच्या श्रीमुखात दोन-तीन हाणल्या. या घटनेने संपूर्ण जिल्हा न्यायालयात खळबळ उडाली. आरोपीला हीच खरी शिक्षा असल्याची प्रतिक्रिया प्रत्यक्ष घटना पाहणारे न्यायालय कक्षातील प्रेक्षक व्यक्त करीत होते. बलात्काराची ही घटना तीन वर्षांपूर्वी २ एप्रिल २०१२ रोजी उमरेड ‘कोल माईन्स’ भागात घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी ही १३ वर्षांची होती. प्रतापसिंग लहरी हा या प्रकरणातील आरोपी आहे. तो कोल माईन्समध्ये चांगल्या हुद्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पीडित मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. ते दलित आहेत. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी ही आपल्या दोन-तीन मैत्रिणींसोबत जात असताना प्रतापसिंग याने मोटरसायकलने त्यांचा पाठलाग केला होता. त्यावेळी प्रतापासिंग याच्यासोबत ‘नट्टू’ नावाचा आणखी एक मित्र होता. त्यावेळी पीडित मुलगी प्रतापसिंगच्या तावडीत सापडून तिच्या सर्व मैत्रिणी घाबरून पळून गेल्या होत्या. प्रतापसिंग याने जबरदस्तीने पीडित मुलीला कोलमाईन्स भागात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी बलात्कार आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून प्रतापसिंग आणि नट्टू या दोघांना अटक केली होती. बलात्काराची ही घटना दूरगामी परिणाम करणारी ठरली. घटनेपासून तिचे शाळेत जाणे बंद झाले. (प्रतिनिधी)‘तुने मेरी जिंदगी खराब की है’पीडित मुलगी ही साक्ष देण्यासाठी साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभी झाली. अतिरिक्त सरकारी वकील वर्षा आगलावे यांनी या मुलीची सर तपासणी साक्ष नोंदवून घेतली. ‘तुम्ही न्यायालयात बसून असलेल्या आरोपींना ओळखता काय?’ असा प्रश्न करताच होय म्हणत ती आरोपी बसून असलेल्या बाकाजवळ गेली. तिने ‘तुने मेरी जिंदगी खराब की है’, असे म्हणत आरोपी प्रतापसिंग याच्या थोबाडीत जोरजोराने दोन-तीन थापडा मारल्या. त्यामुळे आरोपीचा चष्मा तुटून पडला. या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. उपस्थित पोलिसांनी वाघिणीसारख्या चवताळणाऱ्या या मुलीला शांत केले होते. बाहेर हीच खरी शिक्षा, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत होती.