कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव वेतन

By Admin | Updated: April 22, 2016 04:56 IST2016-04-22T04:56:25+5:302016-04-22T04:56:25+5:30

महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांचे किमान वेतन निश्चित केलेले

Incremental salary for contract workers | कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव वेतन

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव वेतन

नागपूर : महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत वगळून) कंत्राटी कामगारांचे किमान वेतन निश्चित केलेले आहे. त्यानुसार वेतन देण्याचे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे. या निर्णयाचा लाभ महापालिकेतील नऊ हजार कंत्राटी कामगारांना मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाने २४ फेब्रुवारी २०१५ रोजी सुधारित वेतनाची अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार कुशल कामगारांना दरमहा १६,६६०, अर्धकुुशल कामगारांना १५,६६० व अकुशल कामगारांना १४,१६० रुपये वेतन देणे आवश्यक होेते. परंतु महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना ७,२०० रुपये वेतन दिले जात होते.
गेल्या वर्षभरात वाढीव वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या वर्षभराच्या वेतन फरकासह सुधारित वेतन देण्याबाबतचे अपर कामगार आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार १ जानेवारी २०१६ पासून वाढीव फरकासह सुधारित वेतन निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या आस्थापनेवर वा संबंधित कंत्राटदारांकडे असलेल्या नऊ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
महापालिका आयुक्तांनी निर्णय घेतल्याने हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे स्वागत म्हणून शुक्रवारी दुपारी महापालिका मुख्यालयात आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा शेकडो कर्मचाऱ्यांसह सत्कार करणार आहोत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आयुक्तांना वेळोवेळी पत्र दिले. सभागृहातही हा मुद्दा लावून धरला. सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला. यात अखेर यश आले.
- प्रफुल्ल गुडधे, नगरसेवक

Web Title: Incremental salary for contract workers