शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्त जवानांना मिळणार वाढीव भत्ता

By admin | Updated: May 27, 2015 03:06 IST

महापालिकेच्या अग्निशमन विभागात उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आलेल्या सेवानिवृत्त जवानांना वा त्यांच्या वारसांना वाढीव भत्ता थकबाकीसह ...

नागपूर : महापालिकेच्या अग्निशमन विभागात उत्कृष्ट कार्यासाठी राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आलेल्या सेवानिवृत्त जवानांना वा त्यांच्या वारसांना वाढीव भत्ता थकबाकीसह देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.राष्ट्रपती पदकप्राप्त जवानांना सेवेत असताना, निवृत्तीनंतर वा त्यांच्या वारसांना प्रतिमाह भत्ता १५०० मंजूर आहे. परंतु गेल्या सहा वर्षांपासून महापालिका या जवानांना वा त्यांच्या कुटुंबीयांना दीड हजाराऐवजी दरमहा शंभर रुपये देत होती. दरम्यान केंद्र सरकारने २५ मार्च २०१५ पासून भत्त्यात वाढ क रून दरमहा ३००० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार १५ जुलै २००९ ते २४ मार्च २०१५ पर्यंतची थकबाकी व त्यानंतर दरमहा ३००० रुपयेप्रमाणे वाढीव भत्ता देण्यात येणार आहे. आगीच्या दुर्घटनेतून लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारे तत्कालीन अग्शिमन विभागाचे प्रमुख अधिकारी दिवंगत सुशीलकुमार सोनक यांच्या पत्नी शीला सोनक, सेवानिवृत्त स्थानाधिकारी देवीसिंग चंदेल, सुरेश तळेकर आदींना राष्ट्रपती पदकाने गौरविण्यात आले होते. परंतु या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना वा त्यांच्या वारसांना अतिरिक्त शंभर रुपये भत्ता दिला जात होता. या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर सुधारित वाढीव भत्ता देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी दिल्याची माहिती समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली.(प्रतिनिधी)