शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

समाजात जातीयवाद वाढतोय

By admin | Updated: October 1, 2014 00:50 IST

सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल.

स्व. भा. ल. भोळे स्मृती व्याख्यान : अमर हबीब यांचे प्रतिपादननागपूर : सध्याचा काळ हा गंभीर चिंतनाचा आहे की नाही, अशी शंका होऊ लागली आहे. सर्वकाही वरवर सुरू आहे. वादळामध्ये दिवा सांभाळण्याचा हा प्रयत्न वाटतो. परंतु तोच दिवा पुढे देशाला वाचवू शकेल. अलीकडे पूर्वीपेक्षा आंतरजातीय विवाह वाढले आहेत. परंतु त्याचवेळी जातीवादही वाढला आहे. सामाजिक बदलातील हा तिढा आज सोडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांनी केले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान व आधार बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भा. ल. भोळे स्मृतिप्रीत्यर्थ ‘सामाजिक बदलांचे नवे संदर्भ’ या विषयावर मंगळवारी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी होते. मंचावर आधार संस्थेचे अविनाश रोडे व विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे रमेश बोरकुटे उपस्थित होते. शंकरनगर चौकातील बाबुराव धनवटे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. हबीब पुढे म्हणाले, सध्या समाजात जो हा बदल घडत आहे. त्यामागे तशीच कारणेही आहेत. पूर्वी शेती हा कुटुंबाचा व्यवसाय होता. संयुक्त कुटुंब पद्घती होती. त्या स्थितीत आंतरजातीय विवाह कठीण होते. परंतु अलीकडे कामाचे स्वरूप बदलले आहे. तरुण-तरुणी एकत्र काम करू लागले आहेत. यातून त्यांना जोडीदार निवडण्याच्या संधी मिळत आहे. आणि म्हणूनच आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढत आहे. मात्र याचा अर्थ जातीयवाद कमी झाला असे म्हणता येणार नाही. जातीयवादी संघटना अधिक आक्रमक झाल्या आहेत. त्यांना आपली माणसे हातून जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ते त्यांना हाताशी धरून ठेवण्यासाठी धडपड करीत आहे. परंतु त्याचवेळी आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जाती, धर्म नष्ट करण्यासाठी अनुकूल वातावरणही तयार होऊ लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सामाजिक शोषणाविषयी बोलताना, त्यांनी नवनिर्मिती करणारा हा नेहमीच शोषित राहिला असल्याचे ते म्हणाले. साहित्यातून नवनवीन कल्पना पुढे आल्या पाहिजे. परंतु अलीकडे या क्षेत्राला शिक्षिकी पेशाची वाळवी लागली असल्याची खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. गिरीश गांधी यांनी अध्यक्षीय भाषणातून सध्या एकिकडे देशाचा विकास होत आहे, पण दुसरीकडे समाज चळवळीचाही विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले. संचालन व आभार प्रदर्शन शुभदा फडणवीस यांनी केले.(प्रतिनिधी)