शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांच्या शिक्षेचे वाढले प्रमाण

By admin | Updated: November 14, 2014 00:52 IST

लाच सापळ्यांच्या वाढीबरोबरच राज्यात लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात चालूवर्षी शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ आणि नागपुरात २४ टक्के आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक

राहुल अवसरे - नागपूरलाच सापळ्यांच्या वाढीबरोबरच राज्यात लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढले आहे. राज्यात चालूवर्षी शिक्षा होण्याचे प्रमाण ३२ आणि नागपुरात २४ टक्के आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार चालू वर्षी आतापर्यंत १९२ प्रकरणांपैकी ६१ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली असून १३१ प्रकरणे निर्दोष ठरली आहेत. शिक्षा होण्याची टक्केवारी ३२ एवढी आहे.२०१३ मध्ये एकूण ३८७ प्रकरणांपैकी ८० मध्ये शिक्षा आणि ३०७ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटल होते. ही टक्केवारी २१ होती. शिक्षेच्या टक्केवारीत ११ ने वाढ झाली आहे. २०१२ मध्ये ४९४ प्रकरणांपैकी ३७६ मध्ये निर्दोष आणि ११८ प्रकरणांमध्ये शिक्षा झाली होती. ही टक्केवारी २४ होती. २०११ मध्ये एकूण ३८३ प्रकरणांपैकी ९० मध्ये शिक्षा तर २९३ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २३ होती. २०१० मध्ये ३५३ प्रकरणांपैकी ६८ मध्ये शिक्षा तर २८५ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी १९ होती. २००९ मध्ये एकूण ४६६ प्रकरणांपैकी १०६ प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाली होती. तर ३६० प्रकरणातील आरोपी निर्दोष ठरले होते. शिक्षेची टक्केवारी २३ होती. नांदेडमध्ये शिक्षेचे प्रमाण सर्वाधिकलाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण नांदेड परिक्षेत्रात सर्वाधिक आहे. चालूवर्षी एकूण ८ प्रकरणांपैकी ४ प्रकरणात शिक्षा आणि ४ प्रकरणे निर्दोष सुटली आहेत. शिक्षेची टक्केवारी ५० आहे. २०१३ मध्ये २२ पैकी ५ मध्ये शिक्षा आणि १७ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २३ होती. २०१२ मध्ये ३३ पैकी ९ मध्ये शिक्षा आणि २४ प्रकरणे निर्दोष ठरली होती. शिक्षेची टक्केवारी २७ होती. २०११ मध्ये २२ प्रकरणांपैकी ३ मध्ये शिक्षा आणि १९ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी १४ होती. २०१० मध्ये १९ पैकी १४ प्रकरणे निर्दोष तर ५ मध्ये शिक्षा झाली होती. ही टक्केवारी २६ होती. २००९ मध्ये ३४ प्रकरणांपैकी ७ मध्ये शिक्षा आणि २७ प्रकरणे निर्दोष सुटली होती. ही टक्केवारी २१ होती. अमरावतीमध्ये शिक्षेचे प्रमाण १४ टक्केअमरावती परिक्षेत्रात लाचखोरांच्या शिक्षेचे प्रमाण सर्वात कमी १४ टक्के आहे. चालू वर्षी २१ प्रकरणांपैकी ३ मध्ये शिक्षा तर १८ मध्ये आरोपी निर्दोष सुटले. २०१३ मध्ये ४६ पैकी १५ मध्ये शिक्षा तर ३१ प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले. शिक्षेची टक्केवारी ३३ होती. २०१२ मध्ये ६२ पैकी १७ मध्ये शिक्षा तर ४५ प्रकरणे निर्दोष होती. शिक्षेची टक्केवारी २७ होती. २०११ मध्ये ३७ पैकी ६ मध्ये शिक्षा आणि ३१ प्रकरणे निर्दोष ठरली. शिक्षेची टक्केवारी १६ होती. २०१० मध्ये ३४ पैकी ६ मध्ये शिक्षा आणि २८ प्रकरणे निर्दोष ठरली होती. ही टक्केवारी १८ होती. २००९ मध्ये ३३ पैकी ७ मध्ये शिक्षा आणि २६ प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले होते. ही टक्केवारी २१ होती. नागपुरात शिक्षेच्या प्रमाणात सुधारणानागपुरात शिक्षा होण्याच्या प्रमाणात सुधारणा होत आहे. चालू वर्षी शिक्षेचे प्रमाण २४ टक्के आहे. एकूण ३८ प्रकरणांपैकी आरोपींना ९ मध्ये शिक्षा तर २९ प्रकरणातील आरोपी निर्दोष सुटले आहेत. २०१३ मध्ये ३५ पैकी ७ मध्ये शिक्षा तर २८ प्रकरणे निर्दोष होती. ही टक्केवारी २० होती. २०१२ मध्ये ३९ पैकी ३२ प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष होते तर ७ मध्ये शिक्षा झाली होती. शिक्षेचे प्रमाण १८ टक्के होते. २०११ मध्ये ४८ पैकी १३ मध्ये शिक्षा तर ३५ प्रकरणे निर्दोष होती. टक्केवारी २७ होती. २०१० मध्ये ३८ पैकी ६ प्रकरणात शिक्षा तर ३२ प्रकरणातील आरोपी निर्दोष ठरले होते. शिक्षेचे प्रमाण १६ टक्के होते. २००९ मध्ये ८९ पैकी २५ मध्ये शिक्षा तर ६४ प्रकरणातील आरोपी निर्दोष होते. ही टक्केवारी २८ होती.