शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
3
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
4
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
5
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
6
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
7
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
8
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
9
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
10
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
11
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
12
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
13
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
14
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
15
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
16
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
17
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
18
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
19
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
20
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या तुलनेत नागपुरात कोरोना मृत्यूच्या प्रमाणात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 07:00 IST

राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे.

ठळक मुद्देराज्यात ३.४५ टक्के, नागपुरात ३.४७ टक्के ४१ ते ५० वयोगटात सर्वाधिक मृत्यू एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ तर आठ दिवसात १६८ रुग्णांचा गेला जीव

सुमेध वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांच्या मृत्यूसंख्येची भयावह आकडेवारी समोर येत आहे. राज्यात ८ ऑगस्टपर्यंत १७,३६७ रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांचे प्रमाण ३.४५ टक्के आहे. त्यातुलनेत नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ८,४०६ झाली असून, मृतांची संख्या २९२ वर पोहचली आहे. मृतांचे प्रमाण ३.४७ टक्क्यांवर गेले आहे. राज्याच्या तुलनेत ही किंचित वाढ असली तरी आरोग्य यंत्रणेने सामोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धक्कादायक म्हणजे, एप्रिल ते जुलै महिन्यात १२४ मृत्यू झाले, तर मागील आठ दिवसात तब्बल १६८ रुग्णांचा जीव गेला आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांची संख्या व मृतांची संख्या जुने विक्रम मोडित काढत आहे. परिणामी, आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. नागपूर जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली. या महिन्यात संख्या केवळ १६ होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात १२२ रुग्णांची भर पडून बाधितांची संख्या १३८ झाली. मे महिन्यात ४०३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णांची संख्या ५४१ झाली. जून महिन्यात ९४१ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या १५०५ वर पोहचली. जुलै महिन्यात ३,८८७ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने, रुग्णांची संख्या ५,३९२ झाली. तर ऑगस्ट महिन्याच्या ८ तारखेपर्यंत ३,०१४ रुग्णांची भर पडल्याने, रुग्णांची संख्या ८,४०६ वर पोहचली आहे. नागपुरात एप्रिल महिन्यात मृत्यूचा दर १.४४ टक्के होता, मे महिन्यात तो २.०३ टक्क्यावर गेला, जून महिन्यात तो पुन्हा खाली येऊन ०.९९ टक्क्यावर आला. जुलै महिन्यात यात वाढ होऊन १.७८ टक्के तर आता मृत्यूचा दर हा ३.४७ टक्क्यावर पोहचला आहे.तरुण वयात मृत्यूचे प्रमाण अधिक२८ जुलैपर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार १ ते १० या वयोगटात १, २१ ते ३० वयोगटात ३, ३१ ते ४० वयोगटात ७, ४१ ते ५० वयोगटात २५, ५१ ते ६० वयोगटात २२, ६१ ते ७० वयोगटात २३, ७१ ते ८० वयोगटात १५ तर ८१ ते ९० वयोगटात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू ४१ ते ५० वयोगटात झाले आहेत.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस