शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अरुण गवळीच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ

By admin | Updated: May 30, 2015 02:48 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने ....

हायकोर्ट : रिट याचिका मंजूर नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे अवकाशकालीन न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या एकलपीठाने जन्मठेपेचा कैदी मुंबईचा डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी याची फौजदारी रिट याचिका मंजूर करून त्याच्या पॅरोलमध्ये १२ जूनपर्यंत वाढ केली. अरुण गवळीला मुलाच्या लग्नासाठी ३० एप्रिल रोजी पंधरा दिवसांची सशर्त पॅरोल मंजूर झाली होती. पॅरोलची मुदत २१ मेपर्यंत होती. १३ मे रोजी त्याने आपल्या ८६ वर्षीय वृद्ध आईच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी पॅरोल ३० दिवसांनी वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज नागपूर विभागीय आयुक्तांकडे केला होता. आयुक्तांनी अर्जावर तातडीने निर्णय न घेतल्याने त्याने उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्याला आधी २६ आणि नंतर २९ मेपर्यंत दिलासा दिला होता. न्यायालयाने उत्तरासाठी राज्य सरकारला नोटीस जारी केली होती. गवळीच्या आईचा आजार गंभीर आजाराच्या यादीत मोडत नाही. त्यामुळे त्याला पॅरोल वाढवून देण्यात येऊ नये, असे सरकारने आपल्या निवेदनात नमूद केले होते.शुक्रवारी न्यायालयाने गवळीच्या वकिलांचा आणि सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून गवळीची याचिका मंजूर केली. त्याला १२ जूनपर्यंत पॅरोल मंजूर केला. न्यायालयात गवळीच्या वतीने वरिष्ठ वकील अ‍ॅड. अनिल मार्डीकर आणि अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी तर सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील शिशीर उके यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)