शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन

By admin | Updated: February 22, 2015 02:41 IST

देशभरातील उत्कृष्ट केंद्रांवर तयार झालेल्या हातमाग उत्पादनांच्या प्रदर्शनाचे कस्तूरचंद पार्कवर आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

नागपूर : देशभरातील उत्कृष्ट केंद्रांवर तयार झालेल्या हातमाग उत्पादनांच्या प्रदर्शनाचे कस्तूरचंद पार्कवर आज, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे उपस्थित होते. हे प्रदर्शन ३१ मार्चपर्यंत चालणार आहे. वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालक रिचा बागला, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे सहप्रबंध संचालक डी.एम. बावने आणि महामंडळाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी फॅशन शोचेही आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनामध्ये टसर सिल्क व कॉटन साड्या, ड्रेस मटेरियल, बेड शिट्स, चादर, गालीचे, वूलन शॉल्स, सोफा कव्हर, पिलो कव्हर, टॉवेल्स व अन्य वस्तूंवर २० टक्के सूट देण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या गृहोपयोगी व सजावटीच्या वस्तूंच्या अनेक व्हेरायटीज माफक दरात उपलब्ध आहेत. या कपड्यांमध्ये नवीन फॅशन सोबतच पारंपरिकतेचीही जोड देण्यात आली आहे. हातमागच्या उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी तसेच ग्राहकांना हातमागची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी अनेक शहरांमध्ये हे प्रदर्शन लावण्यात येते. या प्रदर्शनासाठी इंद्रायणी हँडलूम प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या हातमाग विभागातर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनातील विविध स्टॉल्स, उत्पादने व इतरही माहितीसाठी कस्तूरचंद पार्कवर विशेष स्टॉल लावण्यात आला आहे. या ठिकाणी ग्राहकांना सविस्तर माहिती मिळणार आहे. (वा.प्र.)