काेंढाळी परिसरात लसीकरणाला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:20+5:302021-04-07T04:08:20+5:30

काेंढाळी : काटाेल तालुक्यात काेराेनाबाधित रुग्ण व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने लसीकरणाला गती दिली ...

Inadequate response to vaccination in Kandhali area | काेंढाळी परिसरात लसीकरणाला अल्प प्रतिसाद

काेंढाळी परिसरात लसीकरणाला अल्प प्रतिसाद

काेंढाळी : काटाेल तालुक्यात काेराेनाबाधित रुग्ण व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने लसीकरणाला गती दिली आहे. परंतु काटाेल व काेंढाळी परिसरातील माेठ्या लाेकसंख्येच्या गावात लसीकरणाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली.

काटाेल तालुक्यात दुसऱ्या लाटेत काेराेनाचे रुग्ण व मृतांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, तहसीलदार अजय चरडे व नरखेडचे तहसीलदार डी. जी. जाधव यांच्या नेतृत्वात प्रशासनाची चमू काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी राबत आहे. काटाेल तालुक्यात १६ केंद्रातून काेविड लसीकरण सुरू असनू, ५ एप्रिलपर्यंत एकूण २२,०२१ तर नरखेड तालुक्यात १४ केंद्रातून १४,२१६ नागरिकांनी लस घेतली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी दिली. काेराेनाला आळा घालण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. यासाठी सामाजिक संघटना, ग्रा.पं. पदाधिकारी व स्थानिक लाेकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून गावागावात जनजागृती केली जात आहे. परंतु काटाेल व काेंढाळी परिसरातील माेठ्या गावात लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत आहे.

याबाबत तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे यांच्याशी चर्चा केली असता, काटाेल शहरात ७,१९७ तर ग्रामीण भागात १४,८२८ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आराेग्य विभागातर्फे दरराेज सुमारे ३,४०० जणांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे. मात्र दरराेज केवळ २,००० नागरिक लस घेत आहेत, यावरून लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद हा अल्प असल्याचे स्पष्ट हाेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Inadequate response to vaccination in Kandhali area