शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

साक्षात मृत्यूच समोर होता; हृदयाची मुख्य रक्तवाहिनीच फाटली होती; ‘सुपर’च्या हृदयरोग विभागाने केली यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 08:00 IST

Nagpur News हृदयाचे पंपिंग कमी असल्याकारणाने दाखल झालेल्या एका महिलेवर नागपुरात डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवला.

ठळक मुद्देपरिचारिकांच्या संपकाळात डॉक्टरांचे कौशल्य यशस्वी

सुमेध वाघमारे

नागपूर : मृत्यू अटळ आहे म्हणून काही खासगी हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिला. शेवटचा पर्याय म्हणून रुग्णाला मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. परंतु परिचारिकांचा संप व हृदयाचे पंपिंग कमी असल्याने हृदय शल्यचिकित्सा विभागानेही नकार दिला. मात्र, रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. पी. पी. देशमुख यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपला अनुभव व कौशल्याच्या बळावर जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत महिलेला जीवनदान दिले.

उमरखेड येथील ३८ वर्षीय महिलेला दोन महिन्यापासून दम लागत होता. बसून राहिले तरी त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. या कालावधीत वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखविले. परंतु आजाराचे निदान होत नव्हते. हृदयाची पंपिंग ढासळून २० टक्क्यावर आले होते. प्रकृती चिंताजनक होती. सावंगी मेघे या रुग्णालयात रुग्णालयात भरती केले असता, दुर्मिळ व जीवघेणा आजार ‘आरएसओव्ही टू आरव्हीओटी’ असल्याचे निदान झाले. यात हृदयामधील मुख्य रक्तवाहिनी (एओर्टा) हृदयाच्या उजव्या बाजूच्या कप्प्यात फाटली होती. रक्तवाहिनीला ‘१० एमएम’चे छिद्र पडले होते.

रुग्णाची गंभीर स्थिती पाहता उपचारास दिला नकार

‘आरएसओव्ही टू आरव्हीओटी’मुळे जीवाला धोका निर्माण झाला होता. रुग्णाची गंभीर स्थिती लक्षात घेऊन, काही खासगी डॉक्टरांनी उपचाराला नकार दिला. मृत्यू अटळ असल्याचे पाहता नातेवाईकांनी २९ मे रोजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील हृदयरोग विभागात दाखल केले. रुग्णाच्या अंगावर पूर्ण सूज आली होती. रुग्ण झोपला असतानाही दम लागत होता. विभागाचे प्रमुख डॉ. देशमुख यांनी त्यांची तपासणी करून, दोन दिवसात त्यांची प्रकृती स्थिर केली. तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. यामुळे हॉस्पिटलच्या शल्यचिकित्सकांकडे रुग्णाला पाठविले. परंतु परिचारिकांचा संप, त्यात रुग्णाचे पंपिंग कमी असल्याचे कारण पुढे करीत, रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यास तोंडी नकार दिला.

‘एडीओआय-१’ उपकरणाद्वारे केली शस्त्रक्रिया

मरणाच्या दारात पोहोचलेल्या रुग्णाला बाहेर आणण्यासाठी डॉ. देशमुख यांनीच पुढाकार घेतला. हृदयरोगाच्या विभागाच्या निवासी डॉक्टरांनी परिचारिकांची भूमिका बजावली. डॉ. देशमुख यांनी ‘एडीओआय-१’ उपकरणाच्या मदतीने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली. तातडीच्या शस्त्रक्रियेने रुग्णाला नवे जीवन मिळाले. ही शस्त्रक्रिया डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वात डॉ. अतुल राजपूत यांच्या सहकार्याने करण्यात आली. डॉ. हार्दिक मोरे, डॉ. राज त्रिवेदी, डॉ. अर्शियन व डॉ. नील यांनी परिचारिकांची भूमिका बजावली.

टॅग्स :Healthआरोग्य