शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

अंबाझरी वन संरक्षण निर्णयांवर अंमलबजावणी करा : हायकोर्टाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 10:22 PM

अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त सादर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरातील वनाचे आगीपासून संरक्षण करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयांवर गांभीर्याने अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.संयुक्त वन व्यवस्थापन समितीने गेल्या ३० जुलै रोजी अंबाझरी वन संरक्षणासंदर्भात बैठक घेतली. त्या बैठकीचे इतिवृत्त न्यायालयात सादर करण्यात आले. तसेच, वन विभागाने प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यातील बाबी लक्षात घेता न्यायालयाने हा आदेश दिला. अंबाझरी तलावाच्या बॅक वॉटर परिसरापासून हिंगणा एमआयडीसी व वाडीपर्यंत वन विभागाची सुमारे दोन हजार एकर जमीन आहे. या परिसरात नैसर्गिकरीत्या हजारो झाडे वाढली होती. तसेच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवड मोहीम सुरू केल्यानंतर या ठिकाणी मोठ्या संख्येत वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, गेल्या मे महिन्यामध्ये मध्यरात्री या वनाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाने रात्री २ वाजता घटनास्थळी पोहचून पहाटे ५ वाजेपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळविले, पण तेव्हापर्यंत बराच विलंब झाला होता. दरम्यान,आगीमुळे हजारो झाडे जळून खाक झाली. याविषयी दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या. त्यावरून न्यायालयाने यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली. या प्रकरणावर आता १८ सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयforestजंगलfireआग