शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

नोंदणी होताच तत्काळ फेरफार

By admin | Updated: January 17, 2017 01:52 IST

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत दस्ताची नोंदणी होताच नोंदणी झालेल्या प्रकरणासंदर्भात नोंदणीकृत फेरफार करण्यासाठी ...

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांचा पुढाकार : चकरा मारण्याची गरज नाही, एसएमएसद्वारा मिळणार माहितीनागपूर : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमांतर्गत दस्ताची नोंदणी होताच नोंदणी झालेल्या प्रकरणासंदर्भात नोंदणीकृत फेरफार करण्यासाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसून नोंदणी विभागाकडून फेरफार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सोमवारी दिली.दस्त नोंदणी होताच फेरफारीची प्रक्रिया संदर्भातील उपक्रम सोमवारपासून संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे मिळकतीच्या हस्तांतरणाचे व्यवहार दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयात नोंदविले जातात. नोंदणीकृत दस्तानुसार फेरफार करण्यासाठी मिळकत धारकांना संबंधित नगर भूमापन अथवा भूमिअभिलेख कार्यालयात नामांतरण अर्ज करावा लागत होता. वस्तुत: नोंदणी झालेल्या दस्ताची माहिती संबंधितांना पाठविणे तसेच कलम ५० अन्वये संबंधित भूमापन अधिकारी अथवा तलाठी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे फेरफार करण्यासाठी आवश्यक असतानाही नागरिकांना नामांतरणासाठी वेगळा अर्ज करावा लागत होता. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी या संदर्भात नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी महसूल जमीन अधिनियमांतर्गत दस्ताची नोंदणी होताच फेरफारीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार जिल्ह्यात प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. भूमिअभिलेख कार्यालयातर्फे फेरफार योग्य दस्ताची माहिती नोंदणी विभागाकडून प्राप्त होताच त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात होणार आहे. प्रकरणामध्ये त्रुटी आढळल्यास अर्जदाराला एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. अशा त्रुटींची पूर्तता करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी नगर भूमापन कार्यालयामार्फत विशेष शिबिर घेऊन त्रुटीची पूर्तता करण्यात येऊन फेरफार झाल्यानंतर संबंधितांना एसएमएसद्वारा कळविण्यात येणार आहे. दस्त नोंदणी व फेरफार प्रक्रिया संदर्भात भूमिअभिलेख, सहजिल्हा निबंधक नागपूर शहर व ग्रामीण, सर्व नगर भूमापन अधिकारी, उपअधीक्षक भूमिअभिलेख, सर्व दुय्यम निबंधक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. नोंदणी होताच फेरफाराची प्रक्रिया या उपक्रमाची सुरुवात जिल्ह्यात सुरूझाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.(प्रतिनिधी)