शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग रचनेचे चित्र ७ सप्टेंबरपर्यंत स्पष्ट

By admin | Updated: August 22, 2016 02:34 IST

नागपूरसह राज्यातील नऊ महापालिकांच्या बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग

मनपाच्या हातीच कारभार : राजकीय हालचाली वाढणार नागपूर : नागपूरसह राज्यातील नऊ महापालिकांच्या बहुसदस्यीय पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीसाठी येत्या ७ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने संबंधित महापालिकांना केली आहे. याचा अर्थ कोणत्या प्रभागाची रचना कशी असेल हे महापालिकाच निश्चित करणार आहे. नवीन प्रभाग रचना अस्तित्वात येणार असल्याने महापालिकेतील राजकीय हालचाली वाढणार आहे.नागपूरसह राज्यातील नऊ महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी- मार्च २०१७ मध्ये होणार आहे. बृहन्मुंबई वगळता सर्व महापालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय (चार सदस्यीय) प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना करावी लागणार असल्याने त्यासंबंधीचे काम सुरू करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. या प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव आरक्षणासह ७ सप्टेंबरपर्यंत द्यावयाचा आहे.निवडणुकीसाठी प्रभागरचना प्रारूप तयार करताना अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गासाठी आरक्षित प्रभागांचा समावेश करावा आणि त्याची तपासणी करून प्रस्ताव १२ सप्टेंबरपर्यत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्याची मुदत महापालिकांना देण्यात आली आहे. या प्रारूप प्रभाग रचनेला २३ सप्टेंबरपर्यत निवडणूक आयोगाकडून मान्यता दिली जाणार आहे. प्रभाग रचनेसोबतच महापालिकेत आरक्षित असलेल्या इतर मागासवर्ग, तसेच महिलांच्या जागांसाठी ७ आॅक्टोबर रोजी आरक्षित सोडत काढण्याची आयोगाची सूचना आहे.