दारूची अवैध वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:09 IST2021-03-21T04:09:30+5:302021-03-21T04:09:30+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीदरम्यान बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये देशी ...

Illegal transportation of alcohol continues | दारूची अवैध वाहतूक सुरूच

दारूची अवैध वाहतूक सुरूच

लाेकमत न्यूज नेटवर्क

बुटीबाेरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गस्तीदरम्यान बुटीबाेरी पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये देशी दारूची अवैध वाहतूक करणारी कार पकडली. यात कार चालकास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून कार व दारू असा एकूण ४ लाख ११ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी (दि. १९) दुपारी ३.१० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

प्रमाेद नागाेराव काळे (४२, रा. राजीवनगर, हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपी कार चालकाचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुटीबाेरी परिसरात गस्तीवर हाेते. त्यांना या भागातून कारमध्ये दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी बाेरखेडी शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात पाेलिसांनी एमएच-४०/बीजे-०७३२ क्रमांकाची कार थांबवून झडती घेतली. या कारमध्ये त्यांना देशी दारूच्या १९२ बाटल्या आढळून आल्या.

ती दारूची अवैध वाहतूक असल्याचे कागदपत्रांच्या तपासणीदरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी कारचालक प्रमाेद काळे यास अटक केली, शिवाय त्याच्याकडून कार व दारू जप्त केली. या कारवाईमध्ये चार लाख रुपये किमतीची कार आणि ११,५२० रुपये किमतीची देशी दारू असा एकूण ४ लाख ११ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली. या प्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस हवालदार गजेंद्र चाैधरी, महेया जाधव, रामा आडे, अमृत किनगे यांच्या पथकाने केली.

Web Title: Illegal transportation of alcohol continues