शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

संघ भूमीतच स्वच्छतेकडे दुर्लक्ष !

By admin | Updated: March 2, 2015 02:23 IST

केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा आहे. परंतु संघाची भूमी असलेल्या नागपुरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान उपेक्षित आहे.

लोकमत जागरनागपूर : केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दबदबा आहे. परंतु संघाची भूमी असलेल्या नागपुरातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियान उपेक्षित आहे. कारण येथे लोकसंख्येच्या तुलनेत सार्वजनिक शौचालयांची प्रचंड कमतरता आहे. अजूनही शहराच्या सीमेवरील लोकं उघड्यावरच शौचाला जातात. शहरामधील बाजारपेठांमध्ये तर लघुशंकेसाठीही सुविधा नाही. घोषणा व मोठमोठे दावे करण्यात महानगरपालिकेतील भाजपाप्रणीत नागपूर विकास आघाडीची सरकार आघाडीवर आहे. गेल्या दोन ‘टर्म’पासून महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. तरीही गेल्या १० वर्षात अर्धा डझनही शौचालये बांधण्यात आलेली नाहीत. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली सहा कोटी शौचालये बांधण्याची घोषणा पुन्हा संघभूमीसाठी (नागपूर) दिवास्वप्न बनून राहू नये. महापालिका प्रशासनाने मोठा गाजावाजा करीत ५ वर्षांपूर्वी २७९ शौचालये बांधण्याची घोषणा केली होती. तीन वर्षात चरणबद्ध पद्धतीने ४१ कोटी रुपये खर्चून ही शौचालये बांधण्यात येणार होती. संचालनासाठी कुणी उत्सुक नाही नगरसेवकांच्या सूचनेवर १६ ठिकाणी सुलभ शौचालये बनविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी काही ठराविक ठिकाणांसाठी निविदा जारी करून बीओटीचा प्रस्तावसुद्धा तयार करण्यात आला होता. परंतु यासाठी कुणीच उत्सुकता दाखविली नाही. गांधी चौक सदरस्थित कस्तुरबा मैदान, नवाबपुरा, ढिवरपुरा येथील जुन्या शौचालयाच्या जागेवर, जयताळा बसस्टॉप, एकात्मतानगर, कस्तुरचंद पार्क, श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स समोर, मंगळवारी बाजार येथे मासोळी बाजार आदी ठिकाणी बीओटीचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावावर कुणीही पुढाकार घेतला नाही. शौचालये संचालित करण्यासाठी कुणीच पुढे आले नाही.