शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी पैसे द्या!

By admin | Updated: July 10, 2015 02:52 IST

शहरातील दहन घाटावर मनपातर्फे अंतिम संस्काराची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे.

नागपूर : शहरातील दहन घाटावर मनपातर्फे अंतिम संस्काराची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. याचा सर्वांनाच लाभ मिळतो. परंतु सधन व्यक्तींना या सवलतीची गरज नसल्याचे निदर्शनास आले आहे. गरज नसतानाही हा खर्च होत असल्याने इच्छा असेल तर अंतिम संस्कारासाठी लाकडे विकत घेण्याच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.जुन्या कंत्राटदाराचा दरकरार संपला आहे. पुन्हा दोन वर्षांसाठी निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे नवीन कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. वर्षाला ५,४०० टन लाकडाची गरज भासते. यावर ३.०५ कोटी रु. खर्च होतो. एका अंतिम संस्कारासाठी ३०० किलो लाकूड व १० किलो गोवऱ्या लागतात. दहन घाटाचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. यात सेवाभावी संस्थांना सहभागी करण्याचा मनपाचा विचार असल्याचे समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सांगितले.कन्हान जलविद्युत प्रकल्पाला देण्यात येणाऱ्या ९ टीएमसी पाणी यातून नागपूर शहर व मेट्रोरिजनला पाणीपुरवठा करण्याची योजना जलसंपदा विभागाने तयार केली आहे. हे पाणी जीवनी खापा येथील प्रस्तावित उर्ध्व प्रकल्पात सोडण्यात येईल.येथून ते पाईपलाईनद्वारे अमरावती मार्गावरील वेणा जलाशयात आणले जाणार आहे. यासाठी या प्रकल्पाची उंची वाढविली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च मनपा व नासुप्र यांनी प्रत्येकी ५० टक्के करण्याच्या प्रस्तावाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.६ जून २०१२ च्या स्थायी समितीच्या बैठकीत जीवनी खापा प्रकल्पात नागपूर शहर व मेट्रोरिजनसाठी पाणी आरक्षित ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या प्रकल्पाद्वारे दररोज ७०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. परंतु वेणा जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्यासाठी या प्रकल्पाची उंची वाढविण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)