शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

दूरदृष्टी असेल तर देश बदलेल

By admin | Updated: October 12, 2014 01:17 IST

केंद्रात आघाडी सरकार असताना महागाईने कळस गाठला होता. आघाडी सरकारने केवळ ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकार येताच अवघ्या १०० दिवसात महागाई कमी करण्याचे

नितीन गडकरी : हिंगण्यात जाहीर सभानागपूर : केंद्रात आघाडी सरकार असताना महागाईने कळस गाठला होता. आघाडी सरकारने केवळ ‘गरिबी हटाओ’चे नारे दिले. पण मोदींच्या नेतृत्वातील सरकार येताच अवघ्या १०० दिवसात महागाई कमी करण्याचे प्रयत्न यशस्वीरीत्या सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात भाजपप्रणित सरकार असताना लोडशेडिंग नव्हते. आता पुन्हा एकदा राज्याची सत्ता द्या, संपूर्ण महाराष्ट्र लोडशेडिंगमुक्त करून दाखवतो. देशातील सर्व महामार्ग सिमेंटचे बनविण्याचा आराखडा आज तयार आहे. नागपूर देशातील ‘स्मार्ट सिटी’ व्हावी, यासाठी पहिल्या १०० दिवसात विकासासाठी ४ हजार कोटी रु पयांची कामे मंजूर करून घेतली आहेत. यासाठी के वळ दूरदृष्टी असणे गरजेचे आहे. भाजपाकडे विकासाची दूरदृष्टी असल्याने तुमची वस्ती, शहर, राज्य आणि देशही बदलेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिंगण्यातील जाहीर सभेत केले. समीर मेघे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी सभामंचावर मध्य प्रदेशचे खासदार जनार्दन मिश्रा, माजी खा. दत्ता मेघे, माजी आ. विजय घोडमारे, सौंसरचे आ. नानाभाऊ मोहोड, माजी खा. रामखिलम पटेल, बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्ष सुलेखा कुंभारे, ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. विकास महात्मे, डॉ. राजीव पोतदार, सतीश जिंदल, प्रेम झाडे, पुरुषोत्तम रागीट, सुरत नितनवरे, राम यादव, आनंद कदम, कैलास मंथापूरकर, देवेंद्र बोरेकर, अशोक गोतमारे, विजय मेंढे, वैशाली मेंढे, सरिता यादव, संजय कफनीचोर आदी उपस्थित होते. या विकासकामांसाठी सर्वांनी भाजपाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन गडकरी यांनी यावेळी केले. भाजपला जातीयवादी संबोधून आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीने दलित, बहुजन समाजाची दिशाभूलच केली आहे. भाजप हाच धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे सुलेखा कुंभारे म्हणाल्या. दत्ता मेघे म्हणाले की गडकरी हे विकासाची दृष्टी असणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वातच विदर्भाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. वेगळ्या विदर्भाची आमची मागणी आजही कायम आहे. छोट्या राज्यांच्या निर्मितीसाठी भाजपाची भूमिका अनुकूल असल्यामुळे आपण आशावादी आहोत. (प्रतिनिधी)