शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज दरात सुसूत्रता आणण्याचा विचार

By admin | Updated: May 9, 2014 02:37 IST

सहकारी, राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडून देण्यात येणाऱ्या पीककर्जाच्या दरात सुसूत्रता आणण्याबाबत शासन विचार करीत असून याबाबत एक समिती गठित करण्यात आली आहे.

नागपूर :सहकारी, राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडून देण्यात येणार्‍या पीककर्जाच्या दरात सुसूत्रता आणण्याबाबत शासन विचार करीत असून याबाबत एक समिती गठित करण्यात आली आहे.
सावकाराकडून होणारी शेतकर्‍यांची फसवणूक लक्षात घेऊन केंद्र व राज्य सरकारने सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकर्‍यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. बाजारातील खाजगी बँकाही पीककर्ज देत आहेत. मात्र सर्वच बँकांच्या व्याजदरात फरक असतो. त्यामुळे शेतकरी संभ्रमात येतो.
राज्यात पीककर्ज वाटपासाठी पतसंस्थांची मदत घेतली जाते. जिल्हा सहकारी बँकेच्या तांत्रिक समितीकडून व्याजदर ठरविण्यात येतो. व्याजदर ठरविताना जिल्हा तांत्रिक समिती, राज्य सरकारच्या स्थायी समितीच्या शिफारशी, कृषी खाते, बँका आणि नाबार्डने केलेल्या सूचनाही विचारात घेतल्या जातात. त्यामुळे सहकारी बँकांच्या कर्ज दरात साधारणपणे समानता दिसून येत असली तरी राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या दरात तफावत दिसून येते. शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पीककर्जाच्या दरात समानता असावी, शेतकर्‍यांनी कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतले तरी दर सारखेच असावे तसेच दरात सुसूत्रता असावी यासाठी सहकार खात्याने सहकार आयुक्त व सहकार निबंधक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली होती. या समितीत सहकार खात्याने अंशत: बदल केला आहे.
समितीत कृषी तज्ज्ञासह शासनाच्या संबंधित खात्यांच्या अधिकार्‍याचाही समावेश केला आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पीककर्जाच्या व्याजदरात सुसूत्रता आणण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास शेतकर्‍यांना पीककर्ज कोणत्याही बँकेमार्फत घेणे सुलभ होऊ शकते. (प्रतिनिधी)