शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आयसीएसई, आयएससी दहावी व बारावीचे निकाल जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 21:46 IST

दहावीत आरव साळवे, सारक्षी पाटील, हुसैना नजीब अव्वल, बारावीत हर्षकुमार द्विवेदी, रुद्राक्ष राऊत, हुसैना इजी यांनी मारली बाजी

नागपूर : काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयसीएसई) बाेर्डाचे दहावी आणि बारावीचे निकाल गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आले. ऑनलाइन जाहीर झालेल्या निकालात शहरातील जवळपास सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. दहावीच्या परीक्षेत आरव साळवे, सारक्षी पाटील व हुसैना नजीब अव्वल ठरले, तर बारावीमध्ये हर्षकुमार द्विवेदी, रुद्राक्ष राऊत, हुसैना इजी आणि इनसिया अंबावाला यांनी बाजी मारली. यंदा शहरातील सर्व शाळांचा निकाल समाधानकारक राहिला.निकाल दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. याची माहिती मिळताच विद्यार्थी आपला निकाल जाणून घेण्यासाठी शाळांमध्ये दाखल झाले. उत्तम गुण पाहून विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. गुरुजनांचे आशीर्वाद घेत त्यांनी आनंद साजरा केला. आयसीएसई बाेर्डात दहावीचे जवळपास १००० आणि बारावीमध्ये दीडशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. सर्वच शाळांचा निकाल शंभर टक्के लागला.दहावीच्या परीक्षेत एसएफएफ स्कूल ऑफ एक्सलन्स, सेमिनरी हिल्स येथील आरव अश्विनीकुमार साळवे याने ९७.२ टक्के गुण मिळवले. त्याचप्रमाणे चांदादेवी सराफ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या सारक्षी अमाेल पाटील हिने ९७ टक्के आणि एमएसबी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनच्या हुसैना नजीब हिनेही संयुक्तपणे ९७ टक्के गुण मिळवले. याशिवाय काव्या मेश्राम (९६.२ टक्के), अरमान शेख (९५.६ टक्के), शौर्य चंदनखेड़े (९५.२ टक्के), संस्कार गाैतम रंगारी (९५ टक्के, सेव्हन्थ डे स्कूल), शौर्य साहू (९४.८ टक्के) आणि अनुश्का बिडकर (९४.६ टक्के) यांनीही उल्लेखनीय यश मिळवले.सीडीएसच्या विद्यार्थ्यांचे शानदार यशत्याचप्रमाणे आयएससी बारावीमध्ये विज्ञान शाखेत चंदादेवी सराफ स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या हर्षकुमार विरेंद्रकुमार द्विवेदी याने ९५ टक्के, रुद्राक्ष निलेश राऊत याने ९१ टक्के, ईक्षितराव विन्नाकाेटा याने ९० टक्के, आर्या बिडकर हिने ८६ टक्के आणि शिवांश पटेल याने ८३ टक्के गुण मिळवले. कला शाखेत एमएसबी एज्युकेशन इन्स्टिट्यूशनच्या हुसैना इजी हिने ९२.२ टक्के, तर इनसिया अंबावाला हिने ९४ टक्के गुण मिळवले. शहरात बारावीच्या शाळा तुलनेने कमी असल्या तरी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी गुरुजनांसोबत आपल्या यशाचा आनंद साजरा केला.

English
हिंदी सारांश
Web Title : ICSE, ISC Class 10th & 12th Results Announced

Web Summary : ICSE and ISC results declared, with city schools achieving 100% pass rates. Students like Aarav Salve excelled in class 10, while Harshkumar Dwivedi topped class 12. Celebrations erupted as students rejoiced in their success with teachers.
टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षाStudentविद्यार्थी