शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’

By admin | Updated: June 30, 2014 00:46 IST

मित्र मंडळाच्यावतीने सध्या समाजात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचार व छेडखानीसारख्या घटनांना आळा घालून जनजागृती करण्याच्या हेतूने ‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

मित्र मंडळाचा उपक्रम : फुटाळा चौपाटी येथे शुभारंभ नागपूर : मित्र मंडळाच्यावतीने सध्या समाजात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचार व छेडखानीसारख्या घटनांना आळा घालून जनजागृती करण्याच्या हेतूने ‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या अभियानाचा रविवारी फुटाळा चौपाटी येथे शुभारंभ करण्यात आला. ‘आय रिस्पेक्ट गर्ल्स’ असा संदेश लिहिलेल्या पांढऱ्या टी-शर्ट मधील शेकडो तरुण-तरुणींनी पथनाट्याच्या माध्यमातून लोकांमध्ये महिला सुरक्षेचा संदेश दिला. शिवाय आय रिस्पेक्ट गर्ल्स (आयआरजी) असे लिहिलेल्या लाल रंगाच्या स्टिकरचेही वाटप करण्यात आले. या अभियानाविषयी सविस्तर माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष मृण्मय गोखले म्हणाले, गत दोन-तीन वर्षांत समाजात महिलांवरील अत्याचार व छेडखानीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे आज प्रत्येक महिला स्वत:ला असुरक्षित समजू लागली आहे. अशा स्थितीत महिलांमध्ये अत्याचाराविरुद्ध आवाज उठविण्याचे धाडस व आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश महिलांमध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणे हा आहे. आजपासून या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून, यात पुढील टप्प्यात मुला-मुलींसाठी कार्यशाळा व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या अभियानात मंडळाचे सचिव मैयुरेश गोखले, अमृता संगावार, किरण संगावार, रोशन लिखार, जगन वैद्य व शुभम कुलकर्णी यांच्यासह शेकडो तरुण-तरुणींनी भाग घेतला होता. (प्रतिनिधी)