शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श..झाली एकदाची परीक्षा

By admin | Updated: May 9, 2014 02:33 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'एमएच-सीईटी' ही प्रवेशपरीक्षा गुरुवारी सुरळीतपणे पार पडली.

नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'एमएच-सीईटी' ही प्रवेशपरीक्षा गुरुवारी सुरळीतपणे पार पडली. 'डीएमईआर'तर्फे (डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च) घेण्यात आलेल्या या परीक्षेत नागपूर विभागातील १४ हजार ८१ विद्यार्थी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील ६ हजार ३६0 विद्यार्थ्यांनी उपराजधानीतील परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली.
गुरुवारी सकाळी १0 वाजता परीक्षा सुरू झाली. परंतु 'डीएमईआर'ने दिलेल्या निर्देशांनुसार सर्व परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजल्यापासून विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश देण्यात आला. ठीक १0 वाजता परीक्षेला आरंभ झाला. शहरातील सर्वच केंद्रांवर अगदी निर्विघ्नपणे परीक्षा पार पडली. कुठल्याही केंद्रावरून अनुचित प्रकार घडल्याची माहिती समोर आली नाही. नागपूर जिल्ह्यातील एकूण ६ हजार ५६३ विद्यार्थ्यांपैकी २0३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागात १४,४६१ पैकी ३८0 विद्यार्थी अनुपस्थित होते.
थोडा उत्साह, थोडी भीती
पहिल्यांदाच ही परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थांमध्ये थोडा उत्साह अन् थोडी भीती असे वातावरण होते. परंतु १ वाजता बाहेर पडताना अनेक विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर मोठे दडपण दूर झाल्याचे भाव होते. 'एआयपीएमटी'च्या तुलनेत 'एमएच-सीईटी'चा पेपर सोपा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. विशेषत: रसायनशास्त्र व जीवशास्त्राचा पेपर चांगला केला. केवळ भौतिकशास्त्राचा पेपर थोडा कठीण वाटला, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
पालकांचीदेखील परीक्षा
ही परीक्षा द्यायला नागपूर जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणांहून विद्यार्थी आले होते. शहरात आभाळ असल्याने ऊन जरी फारसे तापले नसले तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडायला आलेल्या पालकांची परीक्षा केंद्रांच्या बाहेर परीक्षाच झाली. अनेकांनी तर तीन तास जवळील झाडाखाली बसूनच घालवला. (प्रतिनिधी) जिल्हा उपस्थित अनुपस्थित
नागपूर ६,३६0 २0३
चंद्रपूर २,१0२ ४७
वर्धा १,५१२ ३१
भंडारा १,७६८ ४२
गोंदिया १,६७४ ३६
गडचिरोली ६६५ २१
एकूण १४,0८१ ३८0