शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून : तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 20:37 IST

पत्नीने तिच्या प्रियकर व त्याच्या चुलत भावाच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा उशीने नाक तोंड दाबून खून केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी आरोपी पत्नीसह अन्य दोघांना अटक केली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील कामठी शहरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कामठी) : पत्नीने तिच्या प्रियकर व त्याच्या चुलत भावाच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा उशीने नाक तोंड दाबून खून केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी आरोपी पत्नीसह अन्य दोघांना अटक केली.राजू हरिदास कोकुर्डे (३५) असे मृताचे नाव असून, अटकेतील आरोपींमध्ये त्याच्या पत्नीसह रुपेश दिलीप बिराह (३५) व त्याचा चुलत भाऊ हरिश्चंद्र राजेंद्र बिराह (३४) या तिघांचा समावेश आहे. राजू हा मूळचा बरबडी (ता., जिल्हा वर्धा) येथील रहिवासी असून, तो स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात परिचारकपदी नोकरीला असल्याने क्वॉर्टरमध्ये  राहायचा. त्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या रुपेश बिराहसोबत प्रेमसंबंध व नंतर अनैतिक जुळले. याबाबत कळताच राजू शहरातील रमानगरात किरायाने घर घेऊन राहू लागला.राजूची पत्नी व रुपेशच्या भेटी सुरूच होत्या. त्यामुळे त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले होते. त्यातच रुपेश घरी येत असल्याने गुरुवारी (दि. ६) रात्री पतीपत्नीचे जोरात भांडणही झाले होते. त्यावेळी रुपेश तिथेच होता. त्याचवेळी रुपेशने राजूला कायम संपविण्याची योजना आखली.तो मध्यरात्री २.१५ वाजताच्या सुमारास हरिश्चंद्रला सोबत घेऊन राजूच्या घरी आला. त्यावेळी राजू, त्याची पत्नी व मुलगा झोपेत होते. राजूच्या पत्नीने दोघांनाही घरात घेतले. त्यांनी दोरीने राजूचे हात बांधले आणि त्याचे नाक व तोंड उशीने जोरात दाबले. श्वास गुदमरल्याने राजूचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही आरोपींना अटक केली. शिवाय, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहेत.मुलगा रडला आणि बिंग फुटलेया प्रकारामुळे राजूच्या पाच वर्षीय मुलाला जाग आली. हा सर्व प्रकार बघून त्याने जोरात रडायला सुरुवात केली. रडण्याच्या आवाजामुळे शेजाऱ्याने औत्सुक्यापोटी खिडकीतून त्यांच्या घरात डोकावून बघितले. हा सर्व प्रकार लक्षात येताच त्याने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यावेळी राजूची पत्नी, रुपेश व हरिश्चंद्र घरीच होते. त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून दोरी, चाकू व उशी जप्त केली. या घटनेमुळे राजूचा मुलगा मात्र अनाथ झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून