शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिट ‘रिफंड’साठी आलेले शेकडो नागरिक गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 01:09 IST

तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना परत करण्यासाठी रक्कम पुरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी इतवारी आणि कामठी आरक्षण कार्यालयात रक्कमच नसल्यामुळे शेकडो नागरिकांवर आल्यापावली परत जाण्याची वेळ आली.

ठळक मुद्देरक्कम नव्हती उपलब्ध : तिकीट विक्री कमी अन् ‘रिफंड’मध्ये अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तीन महिन्यापासून नागरिकांचे तिकिटांचे पैसे अडकून पडले आहेत. रेल्वेने रिफंड देणे सुरु करताच नागरिकांची गर्दी आरक्षण कार्यालयात होत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक प्रवास करण्याचे टाळत असून रिफंड घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना परत करण्यासाठी रक्कम पुरत नसल्याचे चित्र आहे. गुरुवारी इतवारी आणि कामठी आरक्षण कार्यालयात रक्कमच नसल्यामुळे शेकडो नागरिकांवर आल्यापावली परत जाण्याची वेळ आली.नागरिकांनी उन्हाळ्यात प्रवास करण्यासाठी मार्च महिन्यापूर्वीच तिकिटांचे आरक्षण केले होते. परंतु रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे रेल्वेगाड्या ठप्प झाल्या. दरम्यान रेल्वे प्रशासनाने तिकिटाचे बुकिंग केलेल्या प्रवाशांना तिकिटाची १०० टक्के रक्कम परत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे तीन महिने प्रवाशांचे पैसे रेल्वे प्रशासनाकडे अडकले होते. मागील चार दिवसापासून रेल्वे प्रशासनाकडून तिकिटाची रक्कम परत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक आपली रक्कम परत घेण्यासाठी आरक्षण कार्यालयात गर्दी करीत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या वतीने राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. त्यातून आलेले पैसे तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना परत करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले होते. परंतु कोरोनामुळे बहुतांश नागरिक तिकिटांचे आरक्षण करीत नसल्यामुळे रेल्वेला बुकिंगच्या माध्यमातून खूप कमी रक्कम मिळत आहे. उलट तिकीट रद्द करणारे असंख्य प्रवासी येत असल्यामुळे त्यांना देण्यासाठी रक्कमच उरत नसल्याची स्थिती आहे. गुरुवारी सकाळी इतवारी आणि कामठी रेल्वेस्थानकावर आलेल्या प्रवाशांनाही हाच अनुभव आला. आरक्षण खिडक्यांवर रद्द केलेल्या तिकिटांची रक्कम देण्यासाठी रक्कमच उपलब्ध नव्हती. त्यामुळे शेकडो प्रवाशांना आल्यापावली परत जावे लागले.टप्प्याटप्प्याने पाठविण्यात येते रक्कम‘रेल्वेतर्फे चालविण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांसाठी रेल्वे आरक्षण खिडक्या सुरु करण्यात आल्या. यातच प्रवाशांना रिफंड देणे सुरु करण्यात आले. परंतु बुकिंग कमी आणि रिफंड घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे रक्कम पुरत नाही. रेल्वेतर्फे टप्प्याटप्प्याने रक्कम पाठविण्यात येत आहे. प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षण कार्यालयात गर्दी करू नये.’के. व्ही. रमणा, ‘सिनिअर डीसीएम’, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर