शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळ नाही तर कोरोना रोखायचा कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:07 IST

मनपा प्रशासनाला पडला प्रश्न : आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क कोविड रुग्णांची संख्या वाढत ...

मनपा प्रशासनाला पडला प्रश्न : आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. २७ कोविड चाचणी केंद्र व फिरते केंद्र सुरू करण्यात आले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, १०० हून अधिक लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार अशा स्वरूपाच्या जबाबदाऱ्या मनपा प्रशासनाला पार पाडाव्या लागत आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी उपलब्ध केला जात आहे. कोरोनासाठी निधीची कमी नाही. परंतु मनुष्यबळ पुरेसे नसल्याने मनपा प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत आहे.

नागपूर शहरात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३० हजारांहून अधिक आहे. दररोज ३५०० च्या आसपास पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची वाढत असल्याने हॉटस्पॉट भागात कंटेन्मेंट झोन तयार करून कान्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाचा अभाव आहे. वर्षभरापासून कोरोना नियंत्रणात कामावर असलेले कर्मचारी व शिक्षक सेवा देत आहेत. कोरोना कामातील कर्मचाऱ्यांना काही दिवस विश्रांती देण्यासाठी खासगी शाळांवरील शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी मनपा कर्मचाऱ्यांनी केली आहे.

.....

कोविड सेंटरला अधिक सक्षम करावे

कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना होम आयासोलेशनमध्ये ठेवले जाते. परंतु घरी व्यवस्था होत नसल्यास अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जाते. सध्या पाचपावली, व्हीएनआयटी व आमदार निवास आदी ठिकाणी कोविड केअर केंद्र सुरू आहे. मात्र रुग्णांची संख्या विचारात घेता मनपाने कोविड केअर सेंटरला अधिक सक्षम करण्याची गरज आहे.

..

निधीची कमी नाही

कोरोना उपाययोजनांसाठी शासनाकडून निधी मिळत आहे. जवळपास २९ कोटी आजवर प्राप्त झाले. मागणीनुसार निधी मिळत आहे. गरज भासल्यास आणखी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येतील.

राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा