शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याच्या घरात घरोबा

By admin | Updated: September 7, 2014 00:52 IST

सोयीचे वाटले तेव्हा मतदारसंघ बदलून इतर मतदारसंघात घुसखोरी करणाऱ्या नेत्यांची राजकारणात कमी नाही. धन आणि पक्षश्रेष्ठींसोबतच्या जवळीकीचा फायदा उठविणाऱ्या नेत्यांमुळे मात्र स्थानिक नेते

नेत्यांनी बदलविले मतदारसंघ : स्थानिक झाले उपरेनागपूर : सोयीचे वाटले तेव्हा मतदारसंघ बदलून इतर मतदारसंघात घुसखोरी करणाऱ्या नेत्यांची राजकारणात कमी नाही. धन आणि पक्षश्रेष्ठींसोबतच्या जवळीकीचा फायदा उठविणाऱ्या नेत्यांमुळे मात्र स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची गोची होण्याचे प्रसंग यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले. येत्या विधानसभेच्या निवडणुकीतही असेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.१९६२ ते २००९ या दरम्यान झालेल्या निवडणुकीतील उमेदवारांवर नजर टाकली तर अनेक नेत्यांनी त्यांचे मतदारसंघ बदलविल्याचे दिसून येते. कधी मतदारसंघ राखीव झाल्यामुळे, कधी मतदारसंघाची फेररचना झाल्याने तर कधी पूर्वीच्या मतदारसंघातून विजयी होण्याची खात्री नसल्याने राजकीय सोयीसाठी नेत्यांनी मतदारसंघ बदलले आहेत. काही नेते मात्र याला अपवाद आहेत.१९७२ च्या निवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉकचे उमेदवार भगवंतराव गायकवाड मध्य नागपूरमधून लढले आणि पराभूत झाले. १९७८ च्या निवडणुकीत ते कळमेश्वरमधून लढले व विजयी झाले होते. १९७८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे भाऊसाहेब मुळक नागपूर पश्चिममधून विजयी झाले होते. १९८० च्या निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ बदलला व ते उमरेडमध्ये गेले व तेथूनही विजयी झाले. १९७८ मध्ये काँग्रेसचे बनवारीलाल पुरोहित पूर्व नागपूरमधून विजयी झाले होते. १९८० च्या निवडणुकीत त्यांनी दक्षिण नागपूरमध्ये भाग्य आजमाविले व विजयाची मालिका कायम ठेवली.१९८५ आणि १९९० या दोन निवडणुका दक्षिण नागपूरमधून जिंकलेले व १९९५ ची निवडणूक याच मतदारसंघातून पराभूत झालेले काँग्रेस नेते अशोक धवड यांना १९९९ च्या निवडणुकीत पक्षाने पश्चिम नागपूरमधून उमेदवारी दिली होती. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी २००९ मध्ये अपक्ष म्हणून पुन्हा दक्षिणचा आधार घेतला, पण त्यांना दखलपात्र मतेही घेता आली नाहीत.१९९०, १९९५ आणि १९९९ या तीन निवडणुका सावनेरमधून लढणारे व यापैकी १९९९ वगळता इतर दोन निवडणुका जिंकणारे काँग्रेस नेते रणजित देशमुख यांनी २००४ ची निवडणूक पश्चिम नागपूरमधून लढविली होती. त्यावेळी या मतदारसंघातून तत्कालीन महापौर विकास ठाकरे हे काँग्रेस उमेदवारीचे प्रबळ दावेदार होते.मात्र देशमुखांमुळे त्यांची संधी हुकली होती. याच वर्षी कळमेश्वर मतदारसंघातून काँग्रेस नेत्या सुनीता गावंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश बंग यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतरच्या म्हणजे २००९ च्या निवडणुकीत सुनीता गावंडे यांनी मतदारसंघ बदलून कामठीतून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून भाग्य आजमाविले. पण तेथेही त्यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेस नेते अनिस अहमद यांनीही या निवडणुकीत त्यांचा मतदारसंघ बदलला. मध्य नागपूर हा त्यांचा पारंपरिक मतदारसंघ सोडून त्यांनी पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढविली. मतदारसंघ बदलल्याचा फटका त्यांना बसला व निसटता का होईना त्यांना पराभव पत्करावा लागला. मतदारसंघ बदलविण्याची वेळ फक्त काँग्रेस नेत्यांवरच आली असे नाही, तर भाजपही त्याला अपवाद ठरला नाही. २००९ च्या निवडणुकीत भाजपचे संदीप गवई यांनी उत्तर नागपूरसाठी प्रयत्न केले होते. मात्र तेथे पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने ते उमरेड (राखीव)मधून भाजप उमेदवाराच्या विरोधातच लढले. मात्र त्यांचा पराभव झाला.भाजप नेते नाना शामकुळे यांच्याबाबतीतही असाच प्रसंग घडला. राजकारणाची संपूर्ण कारकीर्द नागपूरमध्ये घालविणारे शामकुळे चंद्रपूरमधून लढले आणि विजयीसुद्धा झाले. २०१४ च्या निवडणुकीतही मतदारसंघ बदलण्याचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहेत. यात कुणाला यश येते आणि त्यामुळे कुणावर अन्याय होतो, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)