शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

हनीसिंग व बादशाहच्या नागपूर फेरीवर स्थगिती

By admin | Updated: January 29, 2015 01:02 IST

तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी. पी. सिंग ऊर्फ बादशाह यांना सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी सध्या नागपूरची

हायकोर्ट : सत्र न्यायालयात यावे लागणार नाहीनागपूर : तरुणांच्या गळ्यातील ताईत झालेले पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंग व आदित्य पी. पी. सिंग ऊर्फ बादशाह यांना सत्र न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी सध्या नागपूरची फेरी करावी लागणार नाही. हायकोर्टात त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. सत्र न्यायालयाने दोघांनाही २९ जानेवारी रोजी अर्जांवरील सुनावणीदरम्यान व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केले आहेत. सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची त्यांची विनंती आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी दोघांच्याही अर्जावर शासनाला नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सत्र न्यायालयाच्या आदेशावर पुढील तारखेपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. बादशाहच्या अर्जावर २ फेब्रुवारी, तर हनीसिंगच्या अर्जावर ४ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दोन्ही गायकांच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत असल्याचे जब्बल यांचे म्हणणे आहे. पाचपावली पोलिसांनी सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून दोघेही चौकशीला योग्य सहकार्य करीत नसल्याची माहिती दिली होती. तसेच, अटकपूर्व जामीन अर्जांवर दोघांच्या उपस्थितीतच सुनावणी घेण्याची विनंती केली होती. सत्र न्यायालयाच्या आदेशामुळे दोघांनीही पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बयान नोंदविले आहे. (प्रतिनिधी)फौजदारी याचिकेवरील सुनावणी तहकूबहनीसिंग व बादशाहविरुद्ध कारवाई करण्यात येत नसल्यामुळे जब्बल यांनी हायकोर्टात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात हायकोर्टाने दणका दिल्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी बुधवारी शासनाच्या विनंतीवरून याचिकेवरील सुनावणी एक आठवड्यासाठी तहकूब केली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.