शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या शंकेमुळे नागपुरात घराघरात अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 00:48 IST

रोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० वरून ५५० वर पोहचली आहे. वसाहतीत रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना तर नसेल ना, या शंकेने घराघरात अस्वस्थता दिसून येत आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० वरून ५५० वर पोहचली आहे. वसाहतीत रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना तर नसेल ना, या शंकेने घराघरात अस्वस्थता दिसून येत आहे. परिणामी, स्वत:हून कोविड तपासणीचे प्रमाण वाढले आहे. खासगी प्रयोगशाळेत गेल्या पाच दिवसांत २००वर कोविड चाचण्या झाल्या आहेत.जिल्हात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली असली तरी सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद जुलै महिन्यात झाली. ३,८६७ रुग्ण तर १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रुग्णसंख्येचा विक्रम झाला. बाधितांचा आकडा ५५८वर पोहचला. लोकांमध्ये कोरोनाविषयी असलेली दहशत आणखी वाढली. यातच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या; परंतु लक्षणे नसलेल्यांना होम आयसोलेशन करण्याचा निर्णय घेतल्याने वसाहतीत किंवा घराशेजारी पॉझिटिव्ह रुग्ण असल्याच्या भीतीने भर टाकली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरलचे रुग्ण वाढले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येऊ लागल्याने प्रचंड दहशतीत लोक आहेत. काही डॉक्टरांकडे जाऊन खात्री करून घेत आहेत, काही स्वत:हून औषधी घेत आहेत, तर काही थेट खासगी लॅबमध्ये जाऊन कोविडची चाचणी करून घेत असल्याचे चित्र आहे. परंतु व्हायरल जरी असला तरी घरातल्या घरात फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचे कसे, बारा तास मास्क बांधून राहावे कसे, असे अनेक प्रश्न सामान्यांना भेडसावत आहेत.ताप, सर्दी, खोकल्याच्या औषधांना मागणीजुलै व ऑगस्ट महिन्यात व्हायरलचे रुग्ण वाढतातच. एरवी या आजारावर डॉक्टर सहज औषधी देत होते, परंतु आता ही लक्षणे सांगताच काही डॉक्टर कोविड तपासणी करण्यास सांगत आहेत. मात्र काही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह येऊ या भीतीने तपासणी न करता औषधी दुकानातून ताप, सर्दी व खोकल्यावरील औषधांची मागणी करताना दिसून येत आहेत. विशेषत: पॅरासिटामॉल, अझथ्रिमायसिन अशा औषधांची प्रचंड मागणी वाढली आहे. यावर औषध विक्रेत्यांनी विना प्रिस्क्रिप्शन औषधी न देण्याचा निर्णय घेला आहे.गरम पाणी, वाफेच्या यंत्रांची विक्रीही वाढलीकोरोनाला दूर ठेवणारा सल्ल्यांचा व्हॉॅट्सअ‍ॅप व सोशल मीडियावर धुरळा उडाला आहे. यात गरम पाणी पिण्याकडे व दिवसातून तीनवेळा वाफ घेण्याच्या सल्ल्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. परिणामी, गरम पाणी करण्याची किटली आणि वाफ देण्याच्या यंत्राची विक्री काही पटींनी वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर