शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
2
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
3
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
4
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
5
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
6
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
7
कोणत्याही कराराविना संपला डोनाल्ड ट्रम्प यांचा चीन दौरा; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
8
शनी जयंती २०२६: ऑफिसच्या कामात व्यग्र आहात? तरीही शनी देवाला प्रसन्न करतील 'हे' २ सोपे मंत्र!
9
रुपया ९६ पार, इतिहासात पहिल्यांदा डॉलरच्या तुलनेत इतकी कमकुवत झाली भारतीय करन्सी; सामान्यांवर काय परिणाम होणार?
10
अमित शाह यांना धमकी देणं भोवलं, अभिषेक बॅनर्जी यांच्यावर बंगालमध्ये गुन्हा दाखल; कारवाई होणार
11
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
12
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
13
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
14
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
15
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
16
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
17
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
18
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
19
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
20
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना गृहीत धरणे भोवले

By admin | Updated: May 18, 2014 01:05 IST

परंपरागत मतदारांना गृहीत धरून काँग्रेसने शेवटपर्यंत विजयाचे गणित मांडले. मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा अतिआत्मविश्वास नडला आणि काँग्रेसचा येथेच घात झाला.

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ

परंपरागत मतदारांना गृहीत धरून काँग्रेसने शेवटपर्यंत विजयाचे गणित मांडले. मतमोजणीच्या दिवसापर्यंतचा अतिआत्मविश्वास नडला आणि काँग्रेसचा येथेच घात झाला. आदिवासीबहुल मतदारसंघातही शिवसेनेने प्रचंड आघाडी घेतली. शिवसेनेची ही आघाडी काँग्रेससह सर्वांनाच आत्मचिंतन करायला लावणारी आहे. काँग्रेसने सुरुवातीपासूनच या निवडणुकीत आदिवासी मतदारांवर लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेसचा हा परंपरागत मतदार उमेदवारही त्याच समाजाचा असल्याने काँग्रेसच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असा दावा होता. या सोबतच भाजपविरोधी मतदारही काँग्रेसलाच मदत करतील, अशी अपेक्षा होती. या गणिताच्या आखाड्यातून काँग्रेस यवतमाळ-वाशिममध्ये निश्चितच विजयी होईल, असे शेवटपर्यंत सांगितले जात होते. मात्र मतमोजणीनंतर सर्वांचा फुगा फुटला. पुसद वगळता आदिवासीबहुल मतदारसंघातही काँग्रेसला आघाडी घेता आली नाही. राळेगाव हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आदिवासी समाजाची निर्णायक मते आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष आमदार वसंतराव पुरके या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मोघेसाहेबांसाठी त्यांनी जीवाचे रान केले. मात्र शिवसेनेने याच मतदारसंघात २७ हजार ५५ मतांची आघाडी घेतली. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला २८ हजार ३८८ मतांची आघाडी मिळाली. ही आघाडीही काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह सारे दिग्गज यवतमाळ शहरात असतात. मात्र त्यांनाही आपला प्रभाव मतदारांवर टाकता आला नाही. दारव्हा या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या गृह मतदारसंघातही शिवसेनेने आघाडी घेतली. शिवसेनेचे आमदार संजय राठोड प्रतिनिधित्व करीत असलेल्या या मतदारसंघानेही शिवसेनेलाच जवळ केले. वाशिम या भावना गवळींच्या गृह मतदारसंघात चांगलीच आघाडी घेतली. मात्र कारंजा विधानसभेत मोठ्या आघाडीची अपेक्षा असताना सेनेला तीन हजार ९६२ मतांचीच आघाडी मिळाली. पुसद या एकमेव मतदारसंघात काँग्रेसला २१ हजार २४१ मतांची आघाडी मिळाली. काँग्रेसचे सुरुवातीपासून पुसद आणि राळेगाव या दोन मतदारसंघातील आघाडीवरच विजयाचे गणित होते. पुसदनेही अपेक्षित आघाडी दिली नाही आणि राळेगाव तर आघाडीत सपसेल नापास झाला. भावना गवळींनी ९३ हजार ८१६ मताधिक्य घेतले. २००९ च्या निवडणुकीपेक्षाही त्यांच्या मताधिक्यात यावेळी वाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या मताधिक्याची शिवसेनेला अपेक्षा नव्हती. गवळी यांना झालेल्या मतदानाच्या ४६.३२ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ३७ टक्के मते मिळविता आली. दोन उमेदवार वगळता सर्वांचीच अनामत जप्त झाली. ५० हजारांच्या आत तिसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला समाधान मानावे लागले. मनसे फॅक्टरही येथे कुचकामी ठरला. जय-पराजयाच्या कारणांचा शोध आता राजकीय विश्लेषक घेतील. मात्र काँग्रेसला मतदारांना गृहीत धरणेच अधिक भोवले आणि त्यातच शिवसेनेच्या विजयीची आघाडी वाढली.