शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्हीबाधित उपचारापासून वंचित!

By admin | Updated: March 13, 2015 02:43 IST

मेडिकलच्या अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर असलेल्या एचआयव्हीबाधितांच्या रक्तातील ‘लिम्फोसाईट’ ...

नागपूर : मेडिकलच्या अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर असलेल्या एचआयव्हीबाधितांच्या रक्तातील ‘लिम्फोसाईट’ रक्तपेशींचे (सीडी फोर) प्रमाण मोजणारी मशीन गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. परिणामी उपचारासाठी आलेल्यांना आल्यापावली परत जावे लागत आहे. एचआयव्हीबाधितांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी सरकारने मेडिकलमध्ये २००५ मध्ये ‘एआरटी‘ केंद्र सुरू केले. या केंद्रावर एचआयव्हीबाधितांची तपासणी सहा महिन्यांतून एकदा म्हणजेच वर्षातून दोनदा होते. ‘सीडी-फोर’ मशीनद्वारे रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती मोजली जाते. यामुळे ही मशीन रुग्णांसाठी फार महत्त्वाची आहे. नवीन रुग्णांचे ‘सीडी-फोर’ ३५० पेक्षा खाली गेल्यास त्याच्यावर तत्काळ औषधोपचार सुरू केला जातो. याशिवाय सुरू असलेला औषधोपचाराचा रुग्णावर पडत असलेला प्रभाव पाहण्यासाठी या मशीनचा वापर होतो. यात ‘सीडी-फोर’ प्रमाणापेक्षा कमी आढळल्यास डॉक्टरांना औषधोपचार करणे सोपे जाते. रुग्ण गंभीर होण्यापासून वाचतो. मात्र, मशीन बंद असल्यामुळे दहा हजार रुग्ण प्रभावित झाले आहेत. यात रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. प्रतीक्षेची यादी दिवसेंदिवस वाढत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काहींवर अंदाजित उपचार सुरू आहेत. यासंदर्भात मशीनच्या दुरुस्तीसाठी एआरटी केंद्राकडून संबंधित विभागाला याची माहिती देण्यात आली आहे, परंतु अद्यापही मशीन नादुरुस्तच आहे. उपचाराला उशीर होत असल्याने परिणामी रुग्ण दगावण्याचा धोका बळावत आहे . (प्रतिनिधी)