‘एचआयव्ही’बाधित वडिलांचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By Admin | Updated: May 17, 2015 02:52 IST2015-05-17T02:52:32+5:302015-05-17T02:52:32+5:30

वाईट सवयींमुळे ‘एचआयव्ही’बाधित झालेल्या वडिलांनी पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा लाजिरवाणा प्रकार...

'HIV' affected father's minor girls tortured | ‘एचआयव्ही’बाधित वडिलांचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार

‘एचआयव्ही’बाधित वडिलांचा अल्पवयीन मुलींवर अत्याचार

कामठी : वाईट सवयींमुळे ‘एचआयव्ही’बाधित झालेल्या वडिलांनी पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा लाजिरवाणा प्रकार कामठी शहरात घडला. मुलीच्या आईने हिंमत दाखवून पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर या नराधम वडिलास कामठी पोलिसांनी अटक केली.
सदर आरोपी पत्नी, १६ व १३ वर्षांच्या दोन मुली व १२ वर्षांच्या मुलासह कामठी शहरातील कामगारनगरात राहत असून मजुरी करतो. वाईट सवयींमुळे तो ‘एचआयव्ही’बाधित झाला आणि पुढे त्याची पत्नीही ‘एचआयव्ही’बाधित झाली. अंदाजे दीड वर्षांपूर्वी त्याने त्याच्या मोठ्या मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अतिप्रसंग केला. तिला जीवे मारण्याची धमकी देत त्याने तिचे शारीरिक शोषण करणे सुरूच ठवले. तिनेही भीतीपोटी सदर प्रकाराची कुणाकडेही वाच्यता केली नाही. दरम्यान, शुक्रवारी पत्नी व मोठी मुलगी घरी नसल्याचे पाहून त्याने लहान मुलीला चाकूचा धाक दाखविला आणि तिच्यावर अत्याचार केला. वेदना असह्य झाल्याने तिने घडलेला सर्व प्रकार शुक्रवारी रात्री आई व बहिणीला सांगितला. त्यातच हा प्रकार गेल्या दीड वर्षांपासून सुरू असल्याची माहिती मोठ्या मुलीने आईला दिली. काही विश्वासातील नागरिकांनी त्या आईला हिंमत दिली आणि आईने शुक्रवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. (प्रतिनिधी)

Web Title: 'HIV' affected father's minor girls tortured