शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
3
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
4
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
5
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
6
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
7
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
8
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
9
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
10
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
11
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
12
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
13
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
14
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
15
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
16
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
17
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
18
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
19
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
20
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
Daily Top 2Weekly Top 5

... त्याची खेळी त्याच्यावरच उलटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:20 IST

नरेश डोंगरे। लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सराईत गुन्हेगार पोलिसांच्या कार्यशैलीशी चांगले परिचित असतात. त्यांना पोलिसांचे डावपेचही माहपत असतात. ...

नरेश डोंगरे।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सराईत गुन्हेगार पोलिसांच्या कार्यशैलीशी चांगले परिचित असतात. त्यांना पोलिसांचे डावपेचही माहपत असतात. त्यामुळे गुन्हा केल्यानंतर पोलिसांपासून कसे दूर राहायचे, याची ते आधीच तयारी करून ठेवतात. पोलिसांनी अटक केली तर काय बोलायचे, पीसीआरमध्ये टाईमपास कसा करायचा, याचेही ते होमवर्क करून ठेवतात. त्याचमुळे अनेकदा अटक करूनही पोलीस त्यांच्याकडून पाहिजे तशी रिकव्हरी करण्यात यशस्वी होत नाहीत. मात्र, पोलिसही नेहमीच गुन्हेगारांच्या पुढचा विचार करतात अन् अनेकदा गुन्हेगारांचे डावपेचही त्याच्यावर उलटवतात. पोलीस आणि गुन्हेगारांमधील ही ‘शह-मात’ची खेळी बरेचदा संबंधित वर्तुळात चर्चेला येते. असेच एक शह-मातचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला आले आहे.

यावेळी पोलिसांसोबत खेळी करणारा आणि ती स्वत:वरच उलटून घेणाऱ्या गुन्हेगाराचे नाव आहे सुल्ली ऊर्फ सूर्यकांत प्रभाकर राजूरकर (वय २५). तो इमामवाडा पोलिसांच्या हद्दीतील जाटतरोडीत राहतो. तो अट्टल गुन्हेगार आहे. काही पोलिसांसोबत त्याची मैत्रीही आहे. त्यांच्यासाठी तो टिपर म्हणून काम करतो. सुल्ली गेल्या दीड वर्षापासून पोलिसांच्या रेकॉर्डवर वॉन्टेड होता. तो सापडत नाही, नागपुरात नाही, अशी सबब त्याचा शोध घेणारे सांगायचे. प्रत्यक्षात सुल्ली नागपुरातच होता अन् गुन्हेगारीतही सक्रिय होता. संधी मिळाली की तो मोठा हात मारायचा. महिनाभरापूर्वी त्याने असाच मोठा हात मारून चक्क २० तोळे सोने लंपास केले. गुन्ह्याला महिना झाला त्यामुळे पोलीस शांत झाले, आता ते रिकव्हरीवर जास्त भर देणार नाहीत, असा त्याचा होरा होता. त्यामुळे स्वत:ला अटक करून घ्यायची आणि काही महिन्यानंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर अय्याशी करायची, असा डाव टाकून तो गेल्या आठवड्यात सीताबर्डीतील एका पोलिसाला भेटला. (त्याने सरेंडर केल्याची चर्चा...।) त्याच्याविरुद्ध ताजा गुन्हा सक्करदऱ्यात असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जबरदस्त पाहुणचार देऊन पोलिसांनी सुल्लीचे मनसुबे उधळले. त्यामुळे सुल्लीने चोरीचा ९० टक्के ऐवज पोलिसांच्या हवाली केला. हा तपास जवळपास आता पूर्ण झाला आहे. बुधवारी त्याचा पीसीआर संपणार आहे आणि नंतर त्याला प्रॉडक्शन वॉरंटच्या आधारे सदर पोलीस हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतील. तेथेही त्याची बडदास्त राखली जाईल. त्यानंतर तो कारागृहात पोहचेल. त्याला कधी जामीन मिळेल आणि तो कधी बाहेर येईल, हे सांगता येत नाही. त्याच्याकडून तगडा ऐवज जप्त करून पोलिसांनी तूर्त त्याच्या बाहेर येऊन अय्याशी करण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरत त्याच्यावर मात केली आहे.

---