शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू एकजुटीचा संकल्प

By admin | Updated: January 12, 2015 01:05 IST

विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त येथील रेशीमबाग मैदानावर रविवारी झालेल्या हिंदू संमेलनात हिंदू एकजुटीचा संकल्प करण्यात आला.

विहिंपचा सुवर्णजयंती महोत्सव : हिंदू महासंमेलन नागपूर : विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण जयंतीनिमित्त येथील रेशीमबाग मैदानावर रविवारी झालेल्या हिंदू संमेलनात हिंदू एकजुटीचा संकल्प करण्यात आला.व्यासपीठावर स्वामी चिन्मयानंद सरस्वती, (हरिद्वार), दादा पगलानंद महाराज, साईखेडा, दिनेशचंद्र (दिल्ली), बालयोगी बालकदास महाराज, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर, सुवर्णजयंती महोत्सव समितीचे विदर्भ अध्यक्ष बी.सी. भरतीया, विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष विजयजित वालिया, विहिंपचे महानगर अध्यक्ष सुदर्शन शेंडे, वंदना खुशलानी यांच्यासह विहिंपचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.व्यासपीठावर बसलेल्या सर्व प्रमुख वक्त्यांनी त्यांच्या भाषणात भारताला अधिक बळकट करण्यासाठी आणि हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी हिंदूंची एकजूट आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. इतर सर्व धर्मांपेक्षा हिंदू धर्म प्राचीन असल्याने हिंदूच या देशाचा खरा मालक आहे, आता विश्व कल्याणासाठी हिंदूंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दिनेशचंद्र यांनी केले. ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराला कडाडून विरोध करताना त्यांनी हिंदू धर्मातील वाईट चालीरीतींवरही प्रहार केला. वंदना खुशलानी यांनी हिंदू धर्माची महत्ता सांगितली. स्त्री-पुरुष समानतेला विरोध करताना त्यांनी हिंदू धर्मात महिलांना पुरुषांपेक्षा अधिक सन्मान मिळत असल्याचे अनेक उदाहरण देऊन स्पष्ट केले.चिन्मयानंद सरस्वती यांनीही हिंदू एकजुटीवर भर देत मुस्लीम कट्टरवादावर टीका केली. मुस्लीम कट्टरवादाचा समाना करण्यासाठी हिंदूंची एकजूट आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बाबा पगलानंद महाराज यांनी देशातून गोहत्या बंद करायची असेल तर गाईला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. यावेळी बालयोगी बालकदास महाराज, बी.सी. भरतीया, विजयजित वालिया, सुनील मानसिंगा यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक सुदर्शन शेंडे यांनी केले. संचालन मृणालिनी दस्तुरे यांनी तर आभार वासुदेव नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमाला ब्रह्मस्थानंद महाराज, श्रीरामपंत जोशी, राजेश लोया, दिलीप गुप्ता, हेमंत जांभेकर, राजे मुधोजी भोसले, प्रफुल्ल गाडगे, श्रीकांत आगलावे, संजय चौधरी, सुनील काशीकर, अजय निलादवार, निरंजन रिसालदार, सदन गुप्ता, प्रशांत तितरे यांच्यासह विहिंप आणि संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी)