शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्ग बनलाय मृत्यूमार्ग

By admin | Updated: June 7, 2015 02:56 IST

हल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनियंत्रित वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढतो आहे.

शरद मिरे भिवापूरहल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनियंत्रित वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढतो आहे. जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या मार्गावर भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ विविध अपघात झाले. या अपघातांमध्ये १४ जणांना प्राणास मुकावे लागले तर, १६ जण जखमी व्हावे लागले. त्यामुळे हा मार्ग आता ‘मृत्यूमार्ग’ बनत चालला आहे. भिवापूर हे नागपूर- गडचिरोली राज्य महामार्ग क्रमांक - ९ वरील नागपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण! या मार्गावरून नागपूर - गडचिरोली, नागपूर - चंद्रपूर, नागपूर - भंडारा - गोंदिया व पुढे आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणारी वाहने धावतात. या वाहनांमध्ये एसटी बसेस, ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसेस, इतर प्रवासी वाहने, ट्रक, रेती, गिट्टी, मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने अव्याहतपणे धावत असतात. गोसेखुर्द प्रकल्प, मोखेबर्डी व आंभोरा उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या वाहतुकीत आणखी भर पडली आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागपूर ते नागभीड (जिल्हा चंद्रपूर) या ११० कि.मी. अंतराच्या राज्यमार्गाची अक्षरश: वाट लागली आहे. मार्गावरील खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा मार्ग राज्य महामार्ग असला तरी, त्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे ‘ओव्हरटेक’ करण्याच्या प्रयत्नात जड वाहने पायी चालणाऱ्यांना उडविण्याच्या घटना या मार्गावर सामान्य झाल्या आहेत. या अपघातांमधील अर्धे अपघात सुसाट वेग आणि दारू पिऊन वाहने चालविल्याने झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या वाहनांच्या वेगावर सध्या कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. त्यांच्याविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत वाहनचालकांची तपासणी केली जात नाही. सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असतो.