शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्ग बनलाय मृत्यूमार्ग

By admin | Updated: June 7, 2015 03:12 IST

हल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे.

शरद मिरे  भिवापूरहल्ली नागपूर - गडचिरोली या राज्यमार्गावर रहदारीचे प्रमाण वाढले आहे. त्यात अनियंत्रित वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर अपघातांचा आलेखही त्याच वेगाने वर चढतो आहे. जानेवारी ते मे २०१५ या पाच महिन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास या मार्गावर भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ विविध अपघात झाले. या अपघातांमध्ये १४ जणांना प्राणास मुकावे लागले तर, १६ जण जखमी व्हावे लागले. त्यामुळे हा मार्ग आता ‘मृत्यूमार्ग’ बनत चालला आहे. भिवापूर हे नागपूर- गडचिरोली राज्य महामार्ग क्रमांक - ९ वरील नागपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण! या मार्गावरून नागपूर - गडचिरोली, नागपूर - चंद्रपूर, नागपूर - भंडारा - गोंदिया व पुढे आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाणारी वाहने धावतात. या वाहनांमध्ये एसटी बसेस, ट्रॅव्हल्सच्या खासगी प्रवासी बसेस, इतर प्रवासी वाहने, ट्रक, रेती, गिट्टी, मुरूम व इतर गौण खनिजांची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने अव्याहतपणे धावत असतात. गोसेखुर्द प्रकल्प, मोखेबर्डी व आंभोरा उपसा सिंचन योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने या वाहतुकीत आणखी भर पडली आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागपूर ते नागभीड (जिल्हा चंद्रपूर) या ११० कि.मी. अंतराच्या राज्यमार्गाची अक्षरश: वाट लागली आहे. मार्गावरील खड्ड्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढत चालले आहे. हा मार्ग राज्य महामार्ग असला तरी, त्याची रुंदी कमी आहे. त्यामुळे ‘ओव्हरटेक’ करण्याच्या प्रयत्नात जड वाहने पायी चालणाऱ्यांना उडविण्याच्या घटना या मार्गावर सामान्य झाल्या आहेत. या अपघातांमधील अर्धे अपघात सुसाट वेग आणि दारू पिऊन वाहने चालविल्याने झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या वाहनांच्या वेगावर सध्या कुणाचेही नियंत्रण राहिले नाही. वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. त्यांच्याविरुद्ध कुठलीही ठोस कारवाई केली जात नाही. ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ अंतर्गत वाहनचालकांची तपासणी केली जात नाही. सर्व प्रकार पोलिसांच्या डोळ्यादेखत सुरू असतो.