शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाने वन विभागाला फटकारले

By admin | Updated: June 11, 2015 02:40 IST

मनसर-खवासा रोडच्या दुरावस्थेवरील प्रकरणात आदेशाची अवमानना झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभागाला कडक शब्दांत फटकारले.

झाडे कापण्याचा प्रश्न : मनसर-खवासा रोडचे चौपदरीकरणनागपूर : मनसर-खवासा रोडच्या दुरावस्थेवरील प्रकरणात आदेशाची अवमानना झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी वन विभागाला कडक शब्दांत फटकारले.उच्च न्यायालयाने मनसर-खवासापर्यंतच्या एकूण रोडपैकी १० किलोमीटर (किलोमीटर क्र. ६७९ ते ६८९) रोडच्या चौपदरीकरणासाठी झाडे कापण्याचे आदेश दिले होते. हा आदेश मागे घेण्यासाठी सृष्टी पर्यावरण मंडळाने मध्यस्थी अर्ज सादर केला होता. परंतु, उच्च न्यायालयाने संस्थेला दिलासा दिला नाही. यामुळे संस्थेने दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादात धाव घेतली. गेल्या ६ मे रोजी हरित लवादाने झाडे कापण्यावर स्थगिती दिली. यानंतर ८ मे रोजी मुख्य वनसंरक्षकांनी नागपूर येथील अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पत्र पाठवून झाडे कापणे थांबविण्यास सांगितले. हे प्रकरण बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्यासमक्ष सुनावणीसाठी आले असता प्राधिकरणच्या वकिलांनी वन विभागाच्या पत्राकडे लक्ष वेधले. यामुळे न्यायालय संतप्त झाले. उच्च न्यायालयापेक्षा हरित लवादाचा आदेश मोठा आहे काय, अशी विचारणा वन विभागाला करण्यात आली. तसेच, वादग्रस्त पत्र परत न घेतल्यास आदेशाच्या अवमाननेची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. यानंतर प्रकरणावरील सुनावणी दुसऱ्या सत्रापर्यंत तहकूब करण्यात आली. दुसऱ्या सत्रात वन विभागाने वादग्रस्त पत्र मागे घेण्याची ग्वाही दिली. परिणामी १० किलोमीटरपर्यंतची झाडे कापण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.आता उर्वरित २७ किलोमीटर खराब रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रश्न कायम आहे. या कामासाठीही वन विभागाकडून झाडे कापण्याची परवानगी लागणार आहे. हा मुद्दा विचारात घेण्यासाठी उद्या (गुरुवारी) पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. मनसर-खवासा रोडच्या दुरावस्थेची न्यायालयाने स्वत:हून दखल घेऊन जनहित याचिका दाखल केली आहे. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी मध्यस्थी अर्ज केला आहे. अ‍ॅड. निखिल पाध्ये न्यायालयीन मित्र असून मध्यस्थातर्फे अ‍ॅड. मोहित खजांची तर, महामार्ग प्राधिकरणतर्फे अ‍ॅड. ए. एम. घारे व अ‍ॅड. अनिश कठाणे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)