शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
2
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
3
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
5
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
6
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
7
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
8
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
9
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
10
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
11
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
12
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
13
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
14
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
15
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

तो क्रूरकर्मा रात्रभर मर्डरच करत सुटला .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 12:34 AM

Human mascare क्रूरकर्मा आलोक माटूरकरच्या मनात क्रोधाग्नी अशी काही भडकली होती की तो रात्रभर इकडून तिकडे मर्डरच करत सुटला.

ठळक मुद्देकाळरात्रीचा कुणालाच मागमूस नव्हताआक्रित घडलेच कसे ? सुन्न नातेवाईकांचा सवाल 

नरेश डोंगरे /लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कितीही राग आला तरी तो तास-दोन तासानंतर शांत होतो. आप्तांचे रक्त पाहून व्यक्ती पश्चात्तापाच्या आगीत जळतो. मात्र, क्रूरकर्मा आलोक माटूरकरच्या मनात क्रोधाग्नी अशी काही भडकली होती की तो रात्रभर इकडून तिकडे मर्डरच करत सुटला. हे भयंकर आक्रित सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास उघड झाले अन् पाचपावलीतील चिमाबाईपेठमधील रहिवासी शहारले. काळरात्रीची कुणालाच कशी कल्पना आली नाही, असा सवाल ते एकमेकांना विचारू लागले. लोकमतने या परिसरातील रहिवासी, आलोकचे नातेवाईक यांना बोलते केले. पोलिसांकडूनही प्राथमिक तपासानंतरचा निष्कर्ष जाणून घेतला अन् काळीज कापणारी पार्श्वभूमी पुढे आली.

१५ वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने स्वकीयांनी आलोकला बहिष्कृत केल्यासारखे केले होते. त्याची पर्वा न करता त्याने कष्टातून संसार फुलवला होता. त्याचे पत्नी विजयावर खूप प्रेम होते. मुलगा आणि मुलगी तर त्याला जीव की प्राणच वाटायचे. मेव्हणीवरही त्याचा तेवढाच जीव होता. नातेवाईकांसोबत तो सरळसाधेपणाने वागायचा. बरेच वर्षे त्याच्यासोबत आप्तांपैकी अनेक जण बोलत नव्हते. त्याची पर्वा न करता त्याने आपला व्यवसाय वाढवला. संसारवेलही फुलविली. मुलगी परी आणि मुलगा साहिलला तो फुलासारखा जपायचा. त्याचे वागणे सरळसाधे होते. असे असताना त्याने हे आक्रित घडवलेच कसे, त्याने या सर्वांनाच एवढ्या निर्दयपणे मारलेच कसे, असे प्रश्न नातेवाईकांना पडले आहेत.

नातेवाईकांच्या या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, या थरारकांडाला अनैतिक संबंध, आलोकची शरीरसंबंधाबाबतची विकृती आणि अन् त्यातून निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत असल्याचे पुढे आले.

त्याचा हस्तक्षेप अन् तिचा त्वेष

आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेव्हणी आमिषा केवळ ५ ते ७ वर्षांची होती. ती वयात येण्यापूर्वीपासूनच आलोककडे राहायची. या दोघांनी अनैतिक संबंधातून सर्व मर्यादा तोडल्या. मात्र, दुप्पट वयाचे भावजीसोबत ती रमणे शक्य नव्हते. तिने अनेक मित्र बनविले. त्यामुळे याचा क्रोध, हस्तक्षेप वाढत गेला. मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. तो हक्क दाखवू लागल्याने ती त्वेषात आली.

अन् भडका उडाला

रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास तिने आपल्या मित्राला फोन करून त्याला आवर अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगून टाकले. त्यानंतर सासू आलोकच्या घरी पोहचली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले अन् त्याच्या संतापाचा भडका उडाला. पत्नीने त्याला आमिषाच्या जीवनात ढवळाढवळ कशाला करतो, असे विचारले अन् भडका उडाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आमिषाच याला कारणीभूत असल्याचे त्याच्या डोक्यात गेले अन् एक भयंकर घटनाक्रमाची सुरुवात झाली.

बलात्कार करून केली हत्या

आरोपी आलोक सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे पाहून शरणागती पत्करलेल्या आमिषावर त्याने बलात्कार केला, नंतर तिचा गळा कापला. अर्धनग्न अवस्थेत आमिषाचा मृतदेह सोडून तो निघण्याच्या तयारीत असतानाच सासू बाहेरून दारावर धडकली. त्यामुळे त्याने सासूचीही गळा कापून हत्या केली.

क्रूरकर्मा घरी परतला

मध्यरात्रीनंतर त्याने पत्नीसोबत जबरदस्तीने शय्यासोबत करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे बघून तिने नकार दिल्यामुळे, त्याने विजयाचा धारदार शस्त्राने गळा चिरला. तिने किंकाळी फोडल्याने मुले जागी झाली. परीने विरोध केला असावा. त्यामुळे त्याने तिचे हातपाय बांधले. तरीदेखील तिचा विरोध सुरू असल्यामुळे डोक्यावर हातोडा हाणून तिलाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि आता मुलालाच कशाला ठेवायचे म्हणून त्याने त्याच्या तोंडावर उशी दाबून त्यालाही संपविले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढला आहे.

ते आले अन् ...

सुमारे ५० वर्षे जुन्या नारायणराव निमजे चाळीत वृद्ध देवीदास बोबडे दुसऱ्या माळ्यावर एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहतात. बाजूला राऊत आणि अन्य एक परिवार तर खाली निमजे परिवार राहतो. बोबडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. रविवारी रात्री ते कामावर निघून गेले. पोलिसांच्या मते, त्यांना दारूचे भारी व्यसन आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास टुन्न होऊन ते घरात शिरले. पत्नी आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून असतानादेखील त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. पोलीस घरी आल्यानंतर त्यांची नशा उतरली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर