शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

अपंग वन्यप्राण्यांना पाठविले महाराज बागेत

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

पेंच एनक्लोजरमधील एका नर वाघाला वन विभागातर्फे पुणे येथील कात्रज प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान महाराज बाग प्रशासनाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना

सुदृढ पाठवण्यास टाळाटाळ : प्राणिसंग्रहालय प्रशासनाने लिहिले नाराजी पत्र
नागपूर : पेंच एनक्लोजरमधील एका नर वाघाला वन विभागातर्फे पुणे येथील कात्रज प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. दरम्यान महाराज बाग प्रशासनाने वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
सूत्रांनुसार प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, वन विभागाल जेव्हा आजारी आणि अपंग वन्य प्राण्यांना देखरेखीसाठी ठेवायचे असते तेव्हा महाराज बागेची आठवण होते. परंतु जेव्हा सुदृढ वाघ देण्याची वेळ आली तेव्हा विदर्भाच्या बाहेर नर वाघ पाठविण्याबाबत विचार केला जात आहे. हा एकप्रकारे महाराज बागेसोबत सावत्र वागणुकीचा प्रकार आहे.
प्राणिसंग्रहालयातील अधिकाऱ्यांनुसार वन विभागाच्या माध्यमातून प्राणिसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या तीन मादा वाघिणींंसाठीच पेंचमधील नर वाघ महाराज बागेत आणण्याचे प्रयत्न केले जात होते. यानंतरही नर वाघाला पुण्यातील कात्रज प्राणिसंग्रहालयाला देण्याचा निर्णय अयोग्य आहे.
३ नोव्हेंबर २००८ रोजी वन अधिकाऱ्यांनी चंद्रपूर येथील मेंढकी गावात आजारी पडलेल्या जाई व जुई या वाघिणीला गंभीर अवस्थेत महाराज बागेत आणण्यात आले होते. जुईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतु दुसरी वाघिण जाई ही आता ५ वर्षाची झाली आहे. तसेच २३ जानेवारी २००९ रोजी वन अधिकाऱ्यांनी आपल्या आईपासून दुरावलेल्या तीन आजारी वाघिणीला महाराज बागेत उपचारासाठी आणले. ली, जान आणि चेरी अशी त्यांची नावे ठेवण्यात आली होती. गेल्या वर्षी तीन वर्षाच्या चेरीला छत्तीसगड येथील प्राणिसंग्रहालयाला देण्यात आले. तिथे चेरीने एका वाघाला जन्म दिला. सध्या जान ४ वर्ष आणि जाई ५ वर्षाची झाली आहे.
आता या वाघिणींना एका नर वाघाच्या सोबतीची गरज आहे. त्यादृष्टीने प्राणिसंग्रहालयाने वन विभागाला पेंच एनक्लोजरचा वाघ देण्याची मागणी केली होती. वन विभागाकडून ही मागणी पूर्ण होण्याची प्राणिसंग्रहालयाला अपेक्षाही होती. परंतु आता त्या वाघाला कात्रजला देण्यात येत असल्याच्या चर्चेने महाराज बागेतील वाघिणींना नर वाघाची साथ मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे.
का पाठविले जात आहे वाघाला प्राणिसंग्रहालयात
पेंच एनक्लोजरमध्ये दोन वाघिण आणि एक नर वाघ आहे. यापैकी एका वाघिणीला तज्ज्ञांच्या टीमच्या रिपोर्टनुसार जंगलात सोडायचे आहे. परंतु नर वाघाला मात्र जंगलात सोडण्यास या टीमने अनफिट घोषित केले आहे. अशा परिस्थितीत त्या वाघाला जंगलात सोडता येणे शक्य नाही. त्यामुळे या वाघाला महाराज बाग किंवा कात्रज येथील प्राणिसंग्रहालयात पाठविण्याबाबत वन विभाग विचार करीत आहे. (प्रतिनिधी)