शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
7
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
8
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
9
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
10
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
11
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
13
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
14
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
15
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
16
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
17
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
18
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
19
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
20
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस

By admin | Updated: November 18, 2015 03:06 IST

उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, बेलगाम चोरट्यांनी कोराडी, एमआयडीसी आणि अजनीत घरफोडी केली तर, वाडी आणि गणेशपेठ....

कोराडी, एमआयडीसी, अजनीत घरफोडी : वाडी, गणेशपेठमध्ये चोरीनागपूर : उपराजधानीत चोरट्यांचा हैदोस सुरू असून, बेलगाम चोरट्यांनी कोराडी, एमआयडीसी आणि अजनीत घरफोडी केली तर, वाडी आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी करून रोख तसेच दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास केला.कोराडीतील विद्यानगरात राहाणारे नरेश विजयराव कनेरकर (वय २९) दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मूळगावी बैतूलला (मध्यप्रदेश) गेले होते. सोमवारी सायंकाळी त्यांच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसल्यामुळे शेजाऱ्यांनी कनेरकर यांना फोनवरून माहिती दिली. त्यामुळे ते घरी परतले. चोरट्यांनी त्यांच्या घरातून रोख २० हजार आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकूण १ लाख, ८६ हजारांचा ऐवज लंपास केल्याचे स्पष्ट झाले. कनेरकर यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला.एमआयडीसीतील लोकमान्य नगरात अनिल मदनलाल शर्मा (वय ५२) यांच्याकडे सुद्धा १४ ते १६ नोव्हेंबरच्या दरम्यान घरफोडी झाली. शर्मा परिवारातील सदस्य अमरावतीला गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कुलूप तोडले आणि कपाटातील १ लाख, ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे बिस्कीट चोरून नेले. शर्मा यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नरेंद्रनगरातील बालपांडे लेआऊटमध्येही सोमवारी सकाळी घरफोडीची घटना उघडकीस आली. नेहा मोहित काश्यप (वय ३०) यांचे वडील आपल्या बालपांडे लेआऊटमधील घराच्या दाराला कुलूप लावून मुंबईत राहणाऱ्या मुलाच्या भेटीला गेले आहे. ही संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या दाराचे कुलूप तोडून कपाटातील ७२ हजारांची रोकड लंपास केली. काश्यप यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी घरफोडीची नोंद केली. (प्रतिनिधी)वाडीत दारूचे गोदाम फोडलेदारूचे गोदाम फोडून चोरट्यांनी २ लाख ३७ हजारांच्या दारूच्या बाटल्या लंपास केल्या. सोमवारी सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली. लावा खडगाव मार्गावर प्रीमियर लिकर इंडियाचे गोदाम आहे. चोरट्यांनी १४ ते १६ नोव्हेंबरच्या कालावधीत गोदामाच्या शटरचे कुलूप तोडले. आतमध्ये ठेवलेल्या ब्लेंडर प्राईड व्हीस्की, व्होडका, इम्पेरियल ब्ल्यू व्हीस्की आदी २ लाख, ३७ हजार ७०० रुपयांचे मद्य लंपास केले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर देवीदास बापूराव वंजारी (वय ५५) यांनी वाडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.