शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

बिस्कीटातून दिले गुंगीचे औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 03:21 IST

प्रवासात ओळख वाढवून क्रिम बिस्कीटमधून गुंगीचे औषध दिलेल्या दोन प्रवाशांना तीन दिवसांनी शुद्ध आली.

नागपूर : प्रवासात ओळख वाढवून क्रिम बिस्कीटमधून गुंगीचे औषध दिलेल्या दोन प्रवाशांना तीन दिवसांनी शुद्ध आली. ही घटना चेन्नई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये २८ फेब्रुवारीला घडली.रामप्रवेश उनदेव सहानी (२०) रा. मोतीहारी बिहार आणि राहुलदास कार्तिकदास सारवे (२२) रा. बैय्यर, बालाघाट अशी गुंगीचे औषध दिलेल्या प्रवाशांची नावे आहेत. रामप्रवेश हा चेन्नईला जिंदल नावाच्या कुकर तयार करण्याच्या कंपनीत काम करतो तर राहुलदास चेन्नईला एका बिल्डरकडे काम करतो. दोघेही आपल्या वैयक्तिक कामानिमित्त चेन्नई-जयपूर एक्स्प्रेसच्या जनरल कोचने चेन्नई ते पटणा असा प्रवास करीत होते. प्रवासात एका ५० वर्षीय इसमाशी त्यांची ओळख झाली. संबंधित इसमाचा वर्ण गोरा, केस काळेपांढरे आणि हाताची बोटे भाजलेली होती. त्याने आपण पटणाचे रहिवासी असल्याचे सांगून रामप्रवेश आणि राहुलदास या दोघांनाही वरचा बर्थ दिला. त्यानंतर त्याने क्रिम बिस्कीट या दोघांना खाण्यासाठी दिले. काही वेळातच या दोघांना गाढ झोप लागली. त्याचा फायदा घेऊन आरोपीने रामप्रवेश जवळील १३ हजार रुपये रोख, कपडे, मोबाईल असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल तर राहुलदास जवळील ३ मोबाईल आणि ६०० रुपये रोख असा एकूण १२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळ काढला. दुसरा दिवस उजाडूनही हे दोघे झोपूनच असल्यामुळे गाडीतील प्रवाशांना शंका आली. त्यांनी २९ फेब्रुवारीला ही गाडी नागपुरात येताच याबाबत लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. लोहमार्ग पोलीस दत्तात्रय क्षीरसागर, सचिन प्रधान यांनी या दोघांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले. तेथे मंगळवारी १ मार्चला तिसऱ्या दिवशी ते दोघेही शुद्धीवर आले आणि त्यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)