महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:08 AM2021-04-12T04:08:55+5:302021-04-12T04:08:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली. शासनाने लॉकडाऊन घोषित केले असल्याने ...

Greetings to Mahatma Jotiba Phule | महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

महात्मा जोतिबा फुले यांना अभिवादन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी झाली. शासनाने लॉकडाऊन घोषित केले असल्याने विविध संघटनांनी नियमांचे पालन करीत महात्मा जाेतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले.

बहुजन रिपब्लिकन एकता मंच, कामठी

कामठी : विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे महात्मा जाेतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या वतीने कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मंचच्या संयोजिका व माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सावला सिंगाडे, सुभाष सोमकुवर, उदास बन्साेड, दीपंकर गणवीर, सागर भावे, मयूर पाटील, चंदू कापसे, सुनील वानखेडे, भीमराव आळे, मनोहर गणवीर आदी उपस्थित होते.

....

बहुजन समाज पार्टी, भिवापूर

भिवापूर : बहुजन समाज पार्टीच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जाेतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. बसपाच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमाला डॉ. वसंत खवास, बसपाचे तालुका अध्यक्ष पुनेश्वर मोटघरे, प्रशांत गायकवाड, एकनाथ वराडे, बलवंत जांभुळकर, श्रीकृष्ण खोब्रागडे, रमेश बोरकर, अतुल जनबंधू, सूरज बोरकर, राजकुमार उके, आशिष खंडाळे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. वसंत खवास, पुनेश्वर मोटघरे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्रशांत गायकवाड यांनी तर आभार सुहास पाटील यांनी मानले.

....

ग्रामपंचायत टेकाडी

कन्हान : महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त टेकाडी ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ राेवून महिलांच्या उन्नतीचा मार्ग सुकर केल्याचे मत सरपंच सुनीता मेश्राम यांनी व्यक्त केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सिंधू सातपैसे, सुरेखा कांबळे, माया मनगटे, विनोद इनवाते, अरुण सूर्यवंशी व ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Mahatma Jotiba Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.