नरखेड येथे ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:08 IST2021-04-15T04:08:00+5:302021-04-15T04:08:00+5:30

पंचायत समिती सभागृहात सभापती नीलिमा रेवतकर यांनी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वैभव दळवी, ज्ञानेश्वर मुलताईकर, ...

Greetings to Mahamanwala at various places in Narkhed | नरखेड येथे ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन

नरखेड येथे ठिकठिकाणी महामानवाला अभिवादन

पंचायत समिती सभागृहात सभापती नीलिमा रेवतकर यांनी महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वैभव दळवी, ज्ञानेश्वर मुलताईकर, सतीश रेवतकर, कृषी अधिकारी तोडासे, प्रवीण तेलतुंबडे, शरद पवार, विवेक बालपांडे आदी उपस्थित होते.

नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष अभिजित गुप्ता यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मुख्याधिकारी प्रवीण मानकर, प्रशासन अधिकारी योगेश कुरेकर, उद्धव देशमुख, योगेश डोंगरे, चंद्रशेखर फुलबाधे, चंदन रेवतकर, लीलाधर निकोसे, अनिल धोटकर, राकेश सिंगाडिया, प्रशांत शेंडे, दिलीप नवघरे आदी उपस्थित होते.

लुम्बिनी बुध्दविहार समितीच्या वतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनिल गजबे, हेमंत ढोके, मुकेश शेंडे, सुधाकर ढोके, उदयन बन्साेड, कैलास बारमाटे, राहुल गजबे, रत्नाकर मडके, भावेश मडके आदी उपस्थित हाेते. स्वयंसेवक शाखेच्या वतीने बुद्धविहार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर संघचालक अशोक वेरूळकर, रामेश्वर शेंद्रे, ओमप्रकाश कुर्वे, जयदीप गोहडे, धीरज जंगम, रवी हनवतकर उपस्थित हाेते.

Web Title: Greetings to Mahamanwala at various places in Narkhed