Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:02 IST2026-05-11T11:47:22+5:302026-05-11T12:02:49+5:30
तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत मोडलेला साखरपुडा, 'या' अभिनेत्यासोबत जोडलेलं नाव, पण...

साऊथ अभिनेत्री तृषा कृष्णनचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता थलपती विजय यांच्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पण, ४३ वर्षीय तृषाने अद्याप लग्न का केलं नाही? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. खरं तर तृषाचा एका बिजनेसमॅनशी साखरपुडा झाला होता. मात्र त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.

तृषाने २०१५ साली करिअरच्या शिखरावर असताना बिजनेसमॅन वरुण मनियनसोबत साखरपुडा केला होता. ते लग्नही करणार होते.

मात्र साखरपुड्यानंतर ५ महिन्यांतच त्यांचं लग्न मोडलं. तेव्हा तृषाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

साखरपुडा मोडल्यानंतर तृषा कृष्णन अभिनेता राणा दग्गुबतीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

तृषा कृष्णन आणि राणा दग्गुबतीचा एक फोटोही व्हायरल झाला होता. पण त्या दोघांनी कधीच त्यांचं नातं ऑफिशियल केलं नव्हतं.

आता तृषा कृष्णनच्या मुख्यमंत्री विजय थलपतीसोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांचं अफेअर असल्याचं बोललं जात आहे.

थलपती विजय यांच्या तामिळनाडू मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात तृषा उपस्थित होती.

लग्नाबद्दल तृषा म्हणाली होती की "माझा घटस्फोटावर विश्वास नाही. लग्नानंतर मी घटस्फोट घेऊ इच्छित नाही. माझ्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे लग्न झालेलं असूनही आनंदी नाहीत".
















