शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत एलसीडीवर मिळणार आवश्यक माहिती

By admin | Updated: May 31, 2015 02:44 IST

राज्यातील भौगोलिक व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेची माहिती सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने उपग्रहामार्फत संकलित करून

देवेंद्र फडणवीस : डिजिटल डाटाबेस प्रणालीचे सादरीकरणनागपूर : राज्यातील भौगोलिक व नैसर्गिक साधनसंपत्तीच्या उपलब्धतेची माहिती सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने उपग्रहामार्फत संकलित करून ती महावन डिजिटल डाटाबेस प्रणालीव्दारे सर्व ग्रामपंचायतीत एलसीडीच्या स्क्रीनवर मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. व्हीएनआयटी परिसरातील महाराष्ट्र सूदूर संवेदन उपाययोजना केंद्राच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती संकलन व त्याचा प्रभावी वापर यासाठी महावन डिजिटल डाटाबेस कार्यक्रमाच्या अंमलबजवणी संदर्भात मुख्यमंत्र्यांना सादरीकरणाव्दारे माहिती देण्यात आली. अर्थ व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, पोलीस आयुक्त एस.पी.यादव, वनविभागाचे प्रधान मुख्यवन संरक्षक एस.के.झा. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, सूदूर संवेदन उपयोजन केंद्राचे संचालक डॉ. सुभ्रतो दास आदी उपस्थित होते. सूदूर संवेदन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील भौगोलिक तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीच्या माहिती संकलनासोबतच उपग्रहामार्फत पर्यावरण, शेतीसाठी आवश्यक असणारे पर्जन्यमान, पिकांची माहिती, कृषी विषयक माहिती संकलित करून ग्रामपंचायत कार्यालयात एलसीडीच्या माध्यमातून दिल्यास शेतीचे नियोजन करणे सोयीचे होईल , असे त्यांनी सांगितले. सॅटेलाईटव्दारे प्राप्त होणारी माहिती विश्लेषणाबरोबर शेतीविषयक तसेच नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीसंदर्भात अचूकपणे माहिती संकलित होईल. त्या दृष्टीने प्रणाली विकसित क रण्याची सूचना केली. या प्रणालीमुळे राज्यातील प्रत्येक गावांचे डिजिटल नकासे तयार करणे, जलयुक्त शिवार योजनेत सुरू असलेल्या कामांची माहिती, टंचाईग्रस्त गावात करण्यात आलेल्या उपाययोजना याची माहिती उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी २०० कोटी प्रस्तावित आहे. महावन डिजिटल डाटाबेस या प्रणालीसाठी लागणारा खर्च नियोजन विभागाने शासनाकडे सादर करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. डॉ. सुभ्रतो दास यांनी प्रकल्पाची माहिती दिली. केंद्राचे संशोधक विवेकानंद घारे, दिलीप कोलते, संजय पाटील , आनंद खोब्रागडे, सतीश कोल्हारकर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)