शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

पदवीला ‘सेमिस्टर’ प्रणाली

By admin | Updated: March 17, 2016 03:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील सत्रापासून परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा विचार सुरू आहे.

नागपूर विद्यापीठ : पुढील सत्रापासून अंमलबजावणीचा मानसनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून पुढील सत्रापासून परीक्षा पद्धतीत मोठा बदल करण्याचा विचार सुरू आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम व ‘बीएस्सी’प्रमाणे ‘बीए’, ‘बीकॉम’ यांसारख्या पदवी अभ्यासक्रमांनादेखील ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने आराखडा तयार केला असून यावर लवकरच अंतिम मोहोर लागण्याची शक्यता आहे.नागपूर विद्यापीठाने २०१२ साली पदव्युत्तर अभ्यासक्रमांना ‘क्रेडिट बेस सिस्टीम’सोबतच ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू केली. पदवी अभ्यासक्रमांना ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू करण्यात यावी, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोगाने अगोदरच केली होती. परंतु नागपूर विद्यापीठात याची अंमलबजावणी झाली नव्हती. केवळ ‘बीएसस्सी’ला ही प्रणाली लागू करण्यात आली. परंतु विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी प्रशासनाने यासंदर्भात पुढाकार घेतला आहे. कला, वाणिज्य, समाजविज्ञान शाखांमधील पदवी अभ्यासक्रमांना ‘सेमिस्टर’ प्रणाली लागू करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.दिनेशकुमार अग्रवाल यांची बैठकदेखील झाली. अधिकाऱ्यांनी याचा प्राथमिक आराखडादेखील तयार केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत प्र-कुलगुरू डॉ.येवले यांना विचारणा केली असता त्यांनी या घडामोडीस होकार दिला. विद्यापीठाचा दर्जा वाढला पाहिजे. शिवाय विद्यार्थ्यांनादेखील सुटसुटीतपणे परीक्षा देता आली पाहिजे. यासाठीच आमचा हा विचार सुरू असून पुढील शैक्षणिक सत्रापासून प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमांपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पदवी अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर महाविद्यालयांतील शिक्षकांची प्रचंड धावपळ होणार आहे. ‘सेमिस्टर’चा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे, शिवाय विविध प्रात्यक्षिके ही कामे तर त्यांना करावी लागणार आहेच.शिवाय महाविद्यालयांतील प्रशासकीय कामे, संशोधन, परिषदा, पेपर सादरीकरण यावरदेखील लक्ष देणे गरजेचे राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीदेखील तारेवरची कसरत होणार आहे. (प्रतिनिधी)