¦गोविंद अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:08 IST2021-01-22T04:08:25+5:302021-01-22T04:08:25+5:30

(१० बाय २) नागपूर : गोंविंद अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या खामला येथील प्लॉटवर नुकतेच खामला हाईट्स या सात माळ्याच्या ...

Govind Urban Credit Co-op. Of the Society | ¦गोविंद अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या

¦गोविंद अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या

(१० बाय २)

नागपूर : गोंविंद अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या खामला येथील प्लॉटवर नुकतेच खामला हाईट्स या सात माळ्याच्या ३ बीएचके सदनिकेचे भूमिपूजन करण्यात आले. सदनिकेचे भूमिपूजन नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाचे आमदार व संस्थेचे अध्यक्ष अभिजित वंजारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या व संस्थेच्या संचालिका डॉ. स्मिता अभिजित वंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. सात माळ्याच्या ३ बीएचके सदनिकेत सर्व आधुनिक सोयीसुविधांनी परिपूर्ण २४ फ्लॅट व सहा दुकानांचे प्रशस्त ब्लॉक संस्थेच्या सभासदांना उपलब्ध करून देण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. संस्थेच्या सभासदांनी यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भूमिपूजन समारंभाच्या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष विनायक तुपकर, मानद सचिव विनोद टिकले, खजीनदार तुषार पडगिलवार, संचालक महादेवराव कामडी, चंद्रकांत नागले, नितीन नारनवरे, शैलेंद्र घाटे, नीलेश चोरघडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिता मुदलियार, प्रकल्प व्यवस्थापक सचिन कामडी व मान्यवर उपस्थित होते. (वा. प्र.)

...........

Web Title: Govind Urban Credit Co-op. Of the Society