शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या मदतीसाठी सरकार तत्पर

By admin | Updated: November 15, 2015 02:01 IST

उद्योग उभारून युवकांना रोजगार देण्याचे धोरण उद्योजकांनी ठेवावे. त्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असल्याचे मत खासदार कृपाल तुमाने यांनी येथे केले.

कृपाल तुमाने यांचे प्रतिपादन : नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे दिवाळी संमेलन नागपूर : उद्योग उभारून युवकांना रोजगार देण्याचे धोरण उद्योजकांनी ठेवावे. त्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असल्याचे मत खासदार कृपाल तुमाने यांनी येथे केले. नागपूर चेंबर आॅफ कॉमर्सचे (एनसीसीएल) दिवाळी संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन रामदासपेठेतील एका हॉटेलमध्ये शनिवारी करण्यात आले. त्यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात रा.स्व.संघाचे संघचालक (महानगर) राजेश लोया, एनसीसीएलचे अध्यक्ष कैलास जोगानी, सचिव प्रदीप जाजू, उद्योजक प्रवीण तापडिया, धर्मपाल अग्रवाल, इस्माईल शेख, एनसीसीएलचे माजी अध्यक्ष कमलेश शाह हजर होते.तुमाने म्हणाले, उद्योग क्षेत्राचा विकास होत आहे. त्याचे मूर्त स्वरूप लवकरच दिसेल. राज्याच्या सहकार्याने मॉयलचा फेरो अ‍ॅलॉयचा एक हजार कोटीचा प्रकल्प रामटेक क्षेत्रांतर्गत येत आहे. त्यामुळे युवकांना रोजगार आणि छोट्या उद्योगांना काम मिळेल. शेतकी उत्पादनाचे भाव वाढले, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही, अशी टीका त्यांनी केली. समस्या सांगा, त्यावर तोडगा काढू, असे आवाहन त्यांनी केले. राजेश लोया म्हणाले, ज्यांच्यापासून प्रेरणा घेता येईल, अशांचा सत्कार आहे. व्यापाऱ्यांनी व्यापारी धर्माचे पालन केल्यास ते यशस्वी ठरतील. व्यापाऱ्यांना बाहेर पुरस्कार मिळतात, पण स्थानिकांकडून मिळणे कठीण असते. व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी ग्राहकांची सेवा करावी.मान्यवरांचा सत्कारदिवाळी संमेलनात उद्योजक प्रवीण तापडिया, व्यापार क्षेत्रातील धर्मपाल अग्रवाल आणि सेवा क्षेत्रातील मोहम्मद इस्माईल शेख यांचा सत्कार राजेश लोया आणि कैलास जोगानी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष घनश्याम पनपालिया, राधाकिशन पुनियानी, संतोष अग्रवाल, मोहन मेहाडिया, कमल चोपडा, भागीरथ मुरारका, कमलेश शाह, महेंद्र कटारिया यांचा चेंबरच्या विकासात यशस्वी सहभागाबद्दल सत्कार करण्यात आला. याशिवाय चेंबरच्या परंपरेनुसार विभिन्न व्यापारी संघटनांचे पदाधिकारी प्रकाश मेहाडिया, जयप्रकाश पारेख, कीर्ती अग्रवाल, बागडिया, राजेश भदोरिया, सुनील बजाज, जवाहरलाल चूग, वासुदेव सावलानी, अनिल पारेख, आर.के. वर्मा, पुरुषोत्तम ठाकरे, प्रकाश त्रिवेदी, उमेश पटेल, सदाशिव महाजन, रामकिशन खंडेलवाल, प्रदीप मेहाडिया, रामअवतार अग्रवाल, रामकिशन गुप्ता, विनोद गर्ग, अशोक कोठारी यांचा चेंबरतर्फे सत्कार करण्यात आला. प्रारंभी कैलास जोगानी यांनी चेंबरची रूपरेषा, विविध उपक्रम आणि विकासात्मक कामांची माहिती दिली. संचालन महेंद्र कटारिया यांनी केले. (प्रतिनिधी)