शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वातच : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 21:34 IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चाही पसरली मात्र गडकरी यांनी स्वत: ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार बनेल, असे स्पष्ट केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नसल्याचे केले स्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री पदावरून भाजप-शिवसेना यांच्यात ओढाताण सुरु आहे. यातच सरकार स्थापण्याच्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चाही पसरली मात्र गडकरी यांनी स्वत: ते मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत नसल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार बनेल, असे स्पष्ट केले.मुंबईमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी राजकारण चांगलेच तापले आहे. यातच केंद्रीय मंत्री गडकरी यांना भाजपचे संकटमोचक म्हणून पाहिले जात आहे. असे सांगितले जाते की, गडकरी हे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करून काहीतरी मार्ग काढतील. या सर्व चर्चा सुरु असतानाच गुरुवारी सकाळी गडकरी यांचे नागपुरात आगमन झाले. विमानतळावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, राज्यात लवकरच सरकार स्थापन होण्याबाबत स्थिती स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना महायुतीला राज्यात सरकार बनवण्यासाठी जनादेश मिळाला आहे. महायुती फडणवीस यांच्या नेतृत्वातच सरकार बनवेल. शिवसेना लवकरच भाजपला समर्थन देण्याची घोषणा करेल, असेही गडकरी यांनी सांगितले.रा.स्व.संघाचा सरकार स्थापण्याशी काहीही संबंध नाहीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर येण्यापूर्वी गडकरी यांनी स्पष्ट केले की, संघाचा सरकार स्थापन करण्यात कुठलाही संबंध नाही. संघ याचाही संबंधही ठेवत नाही. महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्याशी डॉ. भागवत यांना जोडले जाऊ नये.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण