शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सरकार पाकीटमार मंत्री घोटाळेबाज

By admin | Updated: December 23, 2015 03:39 IST

राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सरकारला ‘पाकीटमार’ची पदवी देते.

विखे पाटील यांची घणाघाती टीका : मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीनागपूर : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सरकारला ‘पाकीटमार’ची पदवी देते. एवढेच काय तर उच्च न्यायालयादेखील प्रशासकीय कामांमध्ये मंत्र्यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर ताशेरे ओढावे लागतात. डाळींचे भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरते, अशी घणाघाती टीका करीत पाकीटमार सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली. नियम २९२ अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विखे पाटील म्हणाले, शिवसेना व भाजपमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय कामात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळेच सरकारला डाळीच्या किमतीवर नियंत्रण आणण्यात अपयश आले. डाळीचे दरवाढीत चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. सनातन संस्थेला क्लीन चिट देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. राज्यात महिला व दलितांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप करीत पूर्णवेळ गृहमंत्री नेमण्याची मागणी त्यांनी केली. आदिवासी विभागात ई-टेंडर न करता लाखो रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली आहे. कुपोषणग्रस्त बालकांच्या आहार पुरवठ्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील प्रकरणाचा हवाला देत त्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.(प्रतिनिधी)