शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डीसह चौघांना मोक्कातून सशर्त जामीन

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

जरीपटका भागातील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींची मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी

नागपूर : जरीपटका भागातील गोळीबार प्रकरणातील चार आरोपींची मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. हरदीपसिंग ऊर्फ गोल्डी कुलवंतसिंग भुल्लर, निर्मलसिंग ऊर्फ बबलू सतनामसिंग अटवाल, जोगराजसिंग ऊर्फ काके कश्मिरसिंग धिल्लन आणि जुज्जरसिंग ऊर्फ जहरी कश्मिीरसिंग धिल्लन, अशी या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना न्यायालयाने २५ हजाराच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. आरोपींनी भविष्यात यासारखा अपराध करू नये, साक्षीदारांना फितवू नये, अशा अटी न्यायालयाने जामीन आदेशात नमूद केल्या आहेत. या आरोपींविरुद्ध भादंविच्या १४७, १४८, १४९, ३०७, शस्त्र कायद्याच्या ३/२५ आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या कलम ३, ४ अन्वये गुन्हे दाखल आहेत. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत लिटल सरदार आणि त्याच्या साथीदारांवर गोळीबार केल्याचा गोल्डी आणि त्याच्या साथीदारांवर आरोप आहे. गोळीबाराच्या घटनेत एक गोळी लिटल सरदारच्या ड्रायव्हरच्या छातीला लागली होती. या आरोपींविरुद्ध जमीन बळकावण्याचा, दुखापत करण्याचा , हल्ला करण्याचा आणि धमकी देण्याची प्रकरणे पोलिसांत दाखल आहेत. आरोपींचे वकील अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, लिटल सरदार आणि टोळीसोबत आरोपींची चकमक झाली होती. या प्रकरणातील फिर्यादीचे वर्तन संशयास्पद आहे. तो गोळीबारात जखमी झाला परंतु गोळी वाहनाच्या गिअरजवळ आढळली होती. गोळी लागल्यानंतरही तो इकडेतिकडे भटकत होता. दुसऱ्या दिवशी त्याला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याने स्वत:वरील गोळीबाराची तक्रार केली होती. लिटल सरदार आणि टोळीने कारमधून उतरून आरोपींचा पाठलाग केला होता. आरोपींजवळ पिस्तूल होते तर मग ते पळाले का, पोलिसांनी कोणत्याही आरोपींकडून पिस्तूल जप्त केलेले नाही. ड्रायव्हरची जखम गोळीबाराचीच आहे, याबाबत स्पष्ट अभिप्राय नाही. त्यामुळे गुन्ह्याचा एफआयआर खोटा ठरतो, असेही ते म्हणाले. अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी ह्या आपल्या युक्तिवादात जामिनाचा विरोध करताना म्हणाल्या की, गुन्हेगाराची ही संघटित टोळी असून खंडणी,जमीन बळकाव, खुनाचा प्रयत्न, अशा गंभीर प्रकरणात या टोळीचा सहभाग आहे. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी)