सोन्यात घट; चांदीत वाढ

By Admin | Updated: May 13, 2014 00:58 IST2014-05-13T00:58:42+5:302014-05-13T00:58:42+5:30

निकालापूर्वीच्या विश्लेषणात एनडीएची सत्ता येण्याचे संकेत मिळाल्यानंतर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने शेअर

Gold prices fall; Increase in silver | सोन्यात घट; चांदीत वाढ

सोन्यात घट; चांदीत वाढ

नागपूर : निकालापूर्वीच्या विश्लेषणात एनडीएची सत्ता येण्याचे संकेत मिळाल्यानंतर विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्याने शेअर बाजाराचा निर्देशांक उंचावला. त्याचा परिणाम मौल्यवान धातू सोन्यावर पडला. खरेदीअभावी सोन्याच्या दरात घट झाली.

याउलट औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्याने चांदीचे दर तब्बल ५00 रुपयांनी उंचावले. लग्नसराईनंतर सोन्यात घट होण्याचे संकेत सराफा व्यापार्‍यांनी दिले आहेत. सध्या बाजारात सोने खरेदीत ग्राहकांकडून नरमाईचे धोरण आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gold prices fall; Increase in silver